Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime : राज्‍यात सायबर गुन्‍ह्यांचे प्रमाण वाढले

ऑनलाईन आमिषे : गेल्या 27 महिन्यांत 106 प्रकरणांची नोंद

दैनिक गोमंतक

Goa Increase in Cyber Crime: राज्यात गेल्या 27 महिन्यांत 106 सायबर गुन्हे नोंद झाले आहेत. डिजिटल व्यवहारांत वाढ झाल्याने अनेकजण ऑनलाईन आमिषांना बळी पडत आहेत. गेल्यावर्षी 2022 मध्ये 70 तर यावर्षी आतापर्यंत 13 सायबर गुन्ह्यांची प्रकरणे नोंद झालेली आहेत.

सायबर गुन्हे कक्षाकडे अधिक तर दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये ऑनलाईन फसवणूक, फेसबुकवर तोतयेगिरी, विवाह नोंदणी, नोकरी किंवा बक्षीस लागल्याची बोगस माहिती देऊन लुबाडण्‍याची प्रकरणे नोंद झाली आहेत.

अनेकजण फसविले गेल्याचा अंदाज आल्यानंतर ही प्रकरणे कक्षाकडे नोंद करत आहेत. 2021 मध्ये सुरूवातीला 23 प्रकरणे दाखल झाली होती, मात्र 2022 मध्ये ही संख्या 70 वर पोहोचली. यंदा मार्चपर्यंत 13 प्रकरणांची नोंद झाली आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नावर बोलताना दिली.

देशाबाहेरील प्रकरणांपर्यंत पोचणे कठीण

सायबर गुन्हे कक्षात निरीक्षक व उपनिरीक्षकासह 8 कॉन्स्टेबल मिळून एकूण 10 पोलिस कर्मचारी आहेत. या कक्षाकडे अत्याधुनिक तांत्रिक यंत्रणा असल्याने अनेक प्रकरणांचा पर्दाफाश करून संशयितांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.

ज्या प्रकरणांमध्ये ऑनलाईन फेसबुक व ॲपचा स्रोत भारताबाहेर आहे, त्यांच्यापर्यंत पोचण्याची शक्यता अंधुकच असते. ऑनलाईन पैसे पाठविण्यासाठी ज्या बँकांची खाती देण्‍यात येतात, ती बोगस तयार केलेली असतात.

त्यामुळे तपासकामावेळी झालेल्या रकमेचा व्यवहार शोधून काढण्यास कठीण जाते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT