Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: लिंक क्लिक केल्यावर पैसे गेलेच कसे? सायबर चोरांच्या हुशारीसमोर पोलिस थक्क

ऑनलाईन गंडा घालण्याच्या नव्या प्रकाराने पोलिस यंत्रणाही भांबावून गेली आहे. लिंक क्लिक केल्यावर पैसे गेलेच कसे, हे कोडे त्यांनाही पडले आहे.

दैनिक गोमन्तक

Cyber Crime: तुम्हाला एक पार्सल आले असून ते कसे मिळवायचे ते कळण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेली लिंक क्लिक करा, असा फोन बोगदा-वास्को येथील लीना फर्नांडिस यांना आला. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी ती लिंक क्लिक केली आणि त्यांना जबर धक्काच बसला. त्यांच्या खात्यातील पैसे फटाफट काढले जातात, हे लक्षात आले.

त्यांनी ताबडतोब सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधलाही. पण तोपर्यंत त्यांच्या खात्यातून थोडेथोडके नव्हे, तर 99 हजार रुपये हडप केले होते.

ऑनलाईन गंडा घालण्याच्या या नव्या प्रकाराने पोलिस यंत्रणाही भांबावून गेली आहे. लिंक क्लिक केल्यावर पैसे गेलेच कसे, हे कोडे त्यांनाही पडले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत हे करत असून लिंक क्लिक केल्यावर पैसे नेमके कसे वळते झाले, याचा तपास आम्हीही लावण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

2023 साल उजाडून अजून अवघा दीड महिनाच झालेला असताना दक्षिण गोव्यातील सातजणांना सायबर चोरांनी हिसका दाखविला असून या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचे कसे, असा यक्ष प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. या लोकांचे लाखो रुपये हडप करण्यात आले आहेत.

दक्षिण गोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी दक्षिण गोव्यातील एकूण 26 जण अशा प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडले. प्रत्यक्षातील आकडा याहीपेक्षा जास्त असू शकतो, अशी माहिती एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

कारण ज्या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या, त्यांचीच नोंद झाली असून नोंद न झालेली प्रकरणे बरीच असू शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT