Water Supply Dainik Gomantak
गोवा

Curtorim Water Problem: अनियमित पाणीपुरवठ्याने कुडतरीवासीय हैराण; सर्वंकष लेखापरीक्षण करण्याची मागणी

Curtorim: हताश झालेल्या नागरिकांनी मतदारसंघातील संपूर्ण पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वंकष लेखापरीक्षण करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा:अनियमित पाणीपुरवठ्यामुळे सासष्टीतील कुडतरी परिसरातील हताश झालेल्या नागरिकांनी मतदारसंघातील संपूर्ण पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वंकष लेखापरीक्षण करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.

येथील स्थानिकांच्या एका गटाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. कुडतरीचे रहिवासी रॉक मास्कारेन्हास यांनी सांगितले, की पाणी आणि वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा देखील पुरविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या भागातील जलवाहिनी अत्यंत जीर्ण झाली असून त्याच्या त्वरित दुरुस्तीची गरज आहे.

मतदारसंघात अनियमितपणे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या जाणून घेण्यासाठी सर्वंकष ऑडिट करण्याची नितांत गरज आहे. ही समस्या फक्त पाणीपुरवठ्यापुरती मर्यादित नाही, तर वीजपुरवठा आणि रस्त्यांच्या देखभालीसारख्या समस्यांपर्यंतही त्याचा विस्तार आहे.

परिसरातील वीजपुरवठा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेचे लेखापरीक्षण करण्याची मागणी करत नागरिकांनी इतर विभागांनाही असेच निवेदन देण्याची तयारी केली आहे. याविषयीच्या अनेक तक्रारी आहेत, आवश्यक असलेल्या पाणीवितरण व्यवस्थेतील मूलभूत समस्येचे निराकरण झालेले नाही, त्यामुळे सखोल चौकशीची गरज आहे, असेही मास्कारेन्हास म्हणाले.

दैनंदिन जीवनावर परिणाम

पाणीपुरवठ्यात वारंवार होणारा व्यत्यय नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम करत असतो. लेखापरीक्षणाद्वारे पायाभूत सुविधांच्या सद्यःस्थितीचे मूल्यांकन केले पाहिजे, वारंवार होणाऱ्या बिघाडाची मूळ कारणे शोधली पाहिजेत आणि दीर्घकालीन उपाययोजना आखली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT