Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: धक्कादायक! मायणा- कुडतरीत अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

Goa Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना दक्षिण गोव्यातील कुडतरी परिसरात उघडकीस आली आहे.

Sameer Amunekar

माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना दक्षिण गोव्यातील कुडतरी परिसरात उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळापासून लैंगिक अत्याचार आणि तिचा छळ करणाऱ्या नराधमाला मायणा-कुडतरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

दीड वर्षापासून सुरू होता छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अत्याचाराचा प्रकार सप्टेंबर २०२४ पासून सुरू होता. संशयित आरोपी अमर याने पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

इतकेच नव्हे तर, जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याने मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला होता. भीतीपोटी मुलगी गप्प होती, मात्र अखेर हा प्रकार तिच्या आईला समजला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

गुन्ह्याची नोंद

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मायणा-कुडतरी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. संशयित अमर याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(१) आणि ६५(२) नुसार बलात्कार आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त, पीडिता अल्पवयीन असल्याने आरोपीवर 'पोक्सो' (POCSO) कायद्यातील कलम ४, ६, ८, १० आणि १२ सह 'गोवा चिल्ड्रेन ॲक्ट'च्या कलम ८(२) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस तपासाचा वेग वाढला

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, महिला पोलीस उपनिरीक्षक (LPSI) वेरोनिका कुतिन्हो या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीने मुलीला कशा प्रकारे धमकावले होते आणि या गुन्ह्यात त्याला कोणाचे सहकार्य लाभले होते का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT