Curti-Khandepar Dainik Gomantak
गोवा

Curti-Khandepar ग्रामसभेत पार्कींग, बंधारा प्रश्नांवरुन धुमशान

...तर गतवर्षाप्रमाणे अनेक घरांची पडझड होईल

दैनिक गोमन्तक

आज खांडेपार कुर्टी येथे ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत अनेक प्रश्नांवरुन घुमशान उडाले असून या सभेत नागरिकांनी ट्रक पार्कींग, कचरा व्यवस्थावन,खांडेपार नदीवर येणारा बंधारा अशा प्रश्नांवरुन पंचांना धारेवर धरले. तसेच प्रशासन म्हणून आपली काय भुमिका असणार आहे ते स्पष्ट करा असा सुर ही आळवला.

(Curti-Khandepar village panchayat unanimously resolved to oppose the proposed Bandara)

याबद्दल माहिती देताना काही नागरिकांनी सांगितले की, गेल्या पावसाळ्यात पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या अनेक घरांची पडझड झाली होती. येथे बंदारा झाल्यास पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरेल म्हणून यावर आपण दुसरा पर्याय शोधावा.

ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वांचा विचार करत हा बंधारा कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भुमिका घेतली. प्रियोळ मतदारसंघाची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या प्रस्तावित बंधाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. यावरुन नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी खांडेपार कुर्टी पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार म्हणाले की, बंधारा बांधण्यासाठी माजी पंचायतीने डब्ल्यूआरडीला दिलेली एनओसी यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी इतरही अनेक विकासकामे मंजूर करून विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामूळे आपण सध्या बंधाऱ्याबाबत ठोस भुमिका घेतली नसली तरी वाहन पार्कींग, कचरा व्यवस्थापन यावर योग्य नियोजन करणार आहोत. त्यामूळे हे प्रश्न सुटल्याचा आपल्याला आनंद आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT