Deviya Rane: आमदार होताच कामाचा धडाका; पर्येत दिव्या राणेंकडून विविध विकासकामांना हिरवा कंदील

''पर्वरी मतदारसंघाची विकास कामे टप्याटप्याने करणार''
Divya Vishwajit Rane
Divya Vishwajit RaneDainik Gomsntak

पर्येतील विकास कामे वेगाने पुर्ण केली जात असून येत्या काही दिवसात उरलेली कामे मार्गी लावली जाणार आहेत. अशी माहिती आमदार दिव्या राणे यांनी दिली. त्या पर्ये येथे एका विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

(Development of Poriem will be taken up in phases, says Deviya Rane)

यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाल्या की, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी मतदारसंघातील विविध ठिकाणी रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली असून, सरकारकडे सादर केलेले पर्ये मतदारसंघाचे सर्व प्रस्ताव निश्चितपणे मंजूर केले जातील असे त्या म्हणाल्या.

वाळपई-ठाणे रस्ता हॉटमिक्सिंगची मागणी गेले अनेक दिवसांपासून होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याला मंजुरी देताच या प्रकल्पाला सुरूवात होईल अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण होईल, असे राणे म्हणाल्या. यावेळी ठाण्याच्या सरपंच सरिता गावकर म्हणाल्या की, वाळपई शहरापासून ठाणे हे जवळपास 9 किमी अंतरावर आहे, त्यामुळेच हा रस्ता हॉटमिक्‍स करावा, अशी लोकांची मागणी अनेक दिवसांपासून होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com