Curchorem Sex Scandal Dainik Gomantak
गोवा

Curchorem: शोषणकर्त्यांना संरक्षण कशाला? काँग्रेसचा सवाल; कुडचडेतील लैंगिक शोषण प्रकरणाचा पणजीत निषेध

Curchorem Sex Scandal: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या कुडचडेतील सोहम नाईकचे हे कारनामे मागील तीन वर्षांपासून सुरू होते.

Sameer Amunekar

पणजी: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या कुडचडेतील सोहम नाईकचे हे कारनामे मागील तीन वर्षांपासून सुरू होते. त्याने तीसहून अधिक मुलीना धमकावून, व्हिडिओ काढून त्यांचे शोषण केल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. यामुळे देशभर गोव्याची बदनामी होत असून, प्रशासन कोलमडले आहे. 'बेटी बचाओ'ची घोषणा देणारेच बलात्काऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप आज प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

काँग्रेस भवनपासून नारी न्याय मोचां सुरू होण्यापूर्वी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी हा आरोप केला. याप्रसंगी सई वळवईकर, मॉली द गामा, कॅरल माथायश व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.

त्याशिवाय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर व इतर पदाधिकारीही मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस भवनपासून पोलिस मुख्यालयाकडून आझाद मैदानावर हा मोर्चा पोहोचला.

त्याठिकाणी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या आणि कुडचडेतील प्रकरणाचा निषेध करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असताना सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. अशा प्रकारच्या घटना आमच्या गोव्यात घडत आहेत, याची आम्हाला लाज वाटते, असे मॉली द गामा म्हणाल्या.

कुडचडेतील लैंगिक शोषणाचा प्रकार अतिशय निंदनीय असून आपला पक्ष, संघटना बाजूस ठेवून प्रत्येक महिलेने या घटनेविरोधात एकत्रित येऊन न्याय मागणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुशांत नाईकने राजीनामा द्यावा

खलप म्हणाल्या, आज देशभरात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची घटना गाजतेय, राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे. आज गोव्यात महिला असुरक्षित असून सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची जहरी टीका खलप यांनी के ली. दर महिन्याला दोन खून आणि किमान ९ बलात्काराच्या घटना नोंदविल्या जात आहेत. भाजपचे नेते असलेल्या सुशांत नाईकने खरे तर आपल्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

राज्यात एवढी मोठी निंदनीय घटना घडलेली असताना भाजपचा महिला मोर्चा कु ठे आहे? मोठ्या प्रमाणात मुलींचे शोषण करणाऱ्याला कोणतीच भीती वाटली नाही, याचा अर्थ त्याच्या मागे कोणीतरी राजकीय गॉडफादर आहे. एकं दरीत ही घटना पाहता ‘रेवण्णा-२’ गोव्यात तयार झाला असल्याचे दिसते. - अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Crime News: वासनेच्या भरात अभिनेत्याचं क्रूर कृत्य! मोलकरणीचा शरीर संबंधास नकार; नराधमानं पोट, छाती आणि गळ्यावर वार करत केली हत्या

Show of Strength: अंतर्मनातील बंधमुक्ती! महिला कलाकारांच्या प्रभावी कलाकृती; ‘शो ऑफ स्ट्रेंथ’

SCROLL FOR NEXT