

मोरजी: पेडणे तालुक्यातील धारगळ येथील दोन खांब परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील या महत्त्वाच्या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, पुलाचे काम सुरू असताना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि ट्रॅफिक पोलिसांची अनुपस्थिती यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर बनते. अनेकवेळा रुग्णवाहिका, शालेय बस आणि मालवाहू वाहनेही या कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्याची तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.