Curchorem Police caught accused Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : 22 वर्षीय युवकाला गांजा विक्री प्रकरणी अटक; कुडचडे पोलिसांची कारवाई

संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी

सुशांत कुंकळयेकर

Curchorem Police : कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांनी गुरुवारी रात्रौ 9 वा. धाडसी मोहिम राबऊन संशयित युनूस खलील माताजी या 22 वर्षीय युवकाला गांजा विक्री प्रकरणी रांगेहाथ ताब्यात घेलते. त्याच्या कडुन 825 ग्रॅम सुमारे 83 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

कुडचडे पोलिसांच्या माहितीनुसार, युनूस हा गांजा घेऊन कुडचडे बाजारातील गिरीश रेस्टॉरंटच्या पाठीमागे असलेल्या त्याच्या दुकानावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, कुडचडे पोलिसांनी साध्या वेशात पोलिसांना तैनात करून त्याच्यावर पाळत ठेवली होती. भर बाजारात असलेल्या दुकानातून युनूस हा गांजा विक्री करत असल्याची माहीती कुडचडे पोलिसांना मिळाली होती.

सदर माल तो बाजारात उतरवण्या पूर्वीच दुकानावर धाड टाकून कुडचडे पोलिसांनी युनूस याला रंगेहाथ ताब्यात घेतले. अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 20 (ब) (2) (अ) अनव्ये संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या कडून 832 ग्रॅम एवढा गांजा जप्त करण्यात आला.

पोलीस उपअधिक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आज केपे न्यायालयात संशयिताला हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT