Qupem News : केपे मतदारसंघातील विकासाकामांच्या श्रेयावरुन कवळेकर-डिकॉस्‍टा आमनेसामने

दोघांमधील वादाचा केपे मतदारसंघातील लोकांना बसतोय फटका
Babu Kavlekar And ALTONE D’COSTA
Babu Kavlekar And ALTONE D’COSTADainik Gomantak
Published on
Updated on

नवीन सरकार स्थापन होऊन दीड वर्षे होत आले तरी अद्याप एल्टन डिकॉस्‍टा व बाबू कवळेकर यांच्यामधील राजकारण मात्र संपण्याचे नाव घेत नाही. केपे मतदारसंघातील विकासकामांवरून माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्यामधील वाद वेळोवेळी उफाळून येत असल्याने केपे मतदारसंघातील लोकांना फटका बसत आहे.

Babu Kavlekar And ALTONE D’COSTA
Dhirio In Goa : गोव्यात धीरयो कायदेशीर करा; खासदार सार्दिन यांची राज्य सरकारकडे मागणी

आज केपे बाजारात हॉटमिक्स डांबरीकरण कामाच्या शुभारंभावेळी माजी आमदार बाबू कवळेकर म्‍हणाले, ‘सदर काम आपल्या कारकिर्दीत करून घेतले होते. तसेच या कामाबरोबर मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सहकार्य लाभले’, असे सांगितले.

यावेळी आमदार डिकॉस्टा यांनी आज जे काम झाले होते ते आपल्या कारकिर्दीत झाले असल्याचा कागदोपत्री पुरावा सादर केला. केपे मतदारसंघाचा कोणताच विकास झाला नसून, अद्याप बऱ्याच ठिकाणी लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास अपयश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, नगरसेवक दयेश नाईक, अमोल काणेकर, दीपाली नाईक, जाकिना डायस व अन्‍य मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com