Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: 'भिवपाची गरज ना' घोषणेचा निलेश काब्रालांकडून समाचार; कुडचडे येथील प्रलंबित प्रकल्पांवर चिंता व्यक्त

Nilesh Cabral On Curchorem Projects: सध्या कुडचडे येथे चार मोठे प्रकल्प प्रलंबित आहेत, आणि याबद्दल आमदार आणि माजी मंत्री निलेश काब्राल चिंता व्यक्त केली

Akshata Chhatre

कुडचडे: कुडचडे येथील भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्ष पदाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश काब्राल यांनी एक वक्तव्य केले, ज्यामुळे ते सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांच्या मते राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भारतीय जनता पक्षाने कुडचडे येथील लोकांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केलेली नाहीत. सध्या कुडचडे येथे चार मोठे प्रकल्प प्रलंबित आहेत, आणि याबद्दल आमदार आणि माजी मंत्री निलेश काब्राल चिंता व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नानंतरही ही कामं अजूनही राखडलेलीच आहेत. मंत्री काब्राल यांच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिण गोव्यात मडगाव शहरानंतर दुसऱ्या क्रमांकारावर असलेल्या कुडचडे येथील बस स्टेन्डचं काम गेल्या आठ वर्षांपासून राखडलं आहेत किंवा आयटीआयचे प्रकल्प बंदच आहेत.

एका वर्षापुर्वी मुख्यमंत्र्यांनी कुडचडेत हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी 'भिवपाची गरज ना, रडपाची गरज ना' म्हणत अश्वस्थ करणारे भाषण केले होते, मात्र अजूनपर्यंत तिथे विकासाच्या दृष्टीने काहीही पाऊले उचलली गेलेली नाहीत. विकासाचे अनेक प्रकल्प कुडचडेत रखडले आहेत.

गोव्याच्या विविध मंत्र्यांना कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी वेळीच कुडचडेच्या रखडलेल्या प्रकल्पांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. कुडचडेच्या जनतेला सर्व सुख सुविधा मिळाव्यात म्हणून ते नेहमीच प्रयत्न करत राहतील, ज्यात त्यांना इतरांची मदत अपेक्षित असल्याचं ते म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भाजप प्रदेशाध्यक्षांकडूनच वीज खात्याला कानपिचक्या; कारभारावर ताशेरे,जनजागृती न केल्याचा ठपका

कर्मचाऱ्यांचे 'अच्छे दिन'! मनुष्यबळ विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता सहाव्या वेतन आयोगाच्या समकक्ष

उड्डाणपुलाच्या कामामुळे जुने गोवे-गवंडाळी मार्गावर 31 डिसेंबरपर्यंत वाहतूक बंद, अधिसूचना जारी; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Goa Recruitment: जीपीएससी भरती होणार ऑनलाईन; गैरप्रकारांना बसणार आळा, एकाच डिजिटल व्यासपीठावरून भरती

Amazon Insults Aryabhata: ॲमेझॉनच्या जाहिरातीवरून नवा वाद; 'आर्यभटांचा अवमान' केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर नेटकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT