Curchorem News: मुलांच्या आरोग्याशी खेळ! बालरथातूनच नेला कचरा; संतप्त स्थानिक उतरले रस्त्यावर

Curchorem Garbage Problem: कुडचडे पालिकेने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ८० हजार चौरस मीटर जमीन दिली असली तरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण खुल्या जागेत होत आहे
Curchorem Garbage Problem: कुडचडे पालिकेने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ८० हजार चौरस मीटर जमीन दिली असली तरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण खुल्या जागेत होत आहे
Curchorem Waste ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी/केपे: शालेय मुलांना ने-आण करण्यासाठी बालरथ सेवा आहे. परंतु आज सकाळी ज्या शाळेतून मुले स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी आली होती, त्या बालरथातून मुलांनी संकलित केलेला कचरा घेऊन जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी बालरथाचा वापर होतोय काय, असा सवाल करीत मुलांच्या आरोग्याशी सरकारने खेळ चालविला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

मोरायले, कुडचडे येथे खासगी जागेत उघड्यावर गेल्या कित्येक महिन्यापासून कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराकडून ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी व स्थानिक लोकांनी आवाज उठवत, हे काम बंद करण्याची मागणी केली होती.

तसेच याविषयी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. मात्र याची दखल न घेतल्याने गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व स्थानिक रहिवाशांनी आवाज उठवला. दरम्यान, वरील प्रकार आंदोलनकर्त्यांच्या निदर्शनास आला.

कुडचडे पालिकेने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ८० हजार चौरस मीटर जमीन दिली असली तरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण खुल्या जागेत होत आहे. या उघड्या जागेवरील कचऱ्याची वाहने तत्काळ हलविण्यात यावी, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व स्थानिक लोकांनी जमाव केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पाटकर यांनी सांगितले की, कुडचडेतील आजची स्थिती पाहता राज्य सरकारने ''कचरा तुमच्या दारी'' संकल्पना राबवली आहे का, असा प्रश्न पडतो. कारण दीडशे कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारून देखील कुडचडे येथे उघड्यावर कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. याबाबत मंत्र्यांना सांगून देखील कोणतीच सुधारणा झाली नाही. मंत्र्यांनी काम तत्काळ बंद करण्याचे आश्‍वासन दिले होते, पण गेले आठ दिवस हे काम चालू होते, असे पाटकर म्हणाले.

Curchorem Garbage Problem: कुडचडे पालिकेने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ८० हजार चौरस मीटर जमीन दिली असली तरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण खुल्या जागेत होत आहे
Curchorem News: सरकारचा ‘कचरा तुमच्या दारी’ उपक्रम सुरु; कुडचडे कचरा समस्येवरुन अमित पाटकर यांचा टोला

जिल्हाधिकाऱ्यासमवेत आज चर्चा

यावेळी केपेचे संयुक्त मामलेदार सुरेंद्र गावकर व पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी घटनास्थळी येऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत कचऱ्याची वाहने दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नसल्याचे सांगितल्याने अखेर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी लोकांबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याने लोकांनी माघार घेतली. यावेळी कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक वैभव नाईक कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस फौजफाट्यास उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com