Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Curchorem: कुडचडेत राजकीय नाट्य! काब्राल-रोहनमध्ये चढाओढ; उमेदवारांची गर्दी ठरणार डोकेदुखी

Nilesh Cabral: नगरपालिका निवडणूक होण्‍यासाठी अजूनही दहा महिने बाकी असले, तरी या निवडणुकीच्‍या दृष्‍टीने तयारी सुरू झाली असून महत्त्वाच्‍या पालिकांच्‍या बाबतीत काय स्‍थिती असणार याची उत्‍कंठा सर्वांना आहे.

Sameer Panditrao

मडगाव: नगरपालिका निवडणूक होण्‍यासाठी अजूनही दहा महिने बाकी असले, तरी या निवडणुकीच्‍या दृष्‍टीने आत्तापासूनच तयारी सुरू झाली असून काही महत्त्वाच्‍या पालिकांच्‍या बाबतीत काय स्‍थिती असणार याची उत्‍कंठा सर्वांना लागून राहिलेली आहे.

या पार्श्वभूमीवर सध्‍या कुडचडेत भाजपचे आमदार नीलेश काब्राल आणि भाजपचेच कार्यकर्ते असलेले रोहन गावस देसाई यांच्‍यात जी चढाओढ सुरू आहे त्‍याचा परिणाम पालिका निवडणुकीत जाणवणार अशी शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. नीलेश काब्राल हे सतत तीनवेळा कुडचडे मतदारसंघातून भाजप उमेदवारीवर निवडून आलेले असून सध्‍या कुडचडेच्‍या नगरमंडळावरही त्‍यांचे वर्चस्‍व आहे.

असे जरी असले तरी ‘भाजयुमो’ केडरमधून पुढे आलेले युवा उद्योजक आणि ‘बीसीसीआय’च्या संयुक्‍त सचिवपदापर्यंत पोहोचलेले रोहन गावस देसाई यांनीही कुडचडेच्‍या भाजप उमेदवारीवर दावा करणे सुरू केले आहे. सध्‍या गावस देसाई यांनी कुडचडेत रेनकोट वाटण्‍याची मोहीम उघडली आहे. याच पार्श्वभूमीवर आता येत्‍या पालिका निवडणुकीत कुडचडेत कुणाचा गट वरचढ ठरेल यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

सध्‍या कुडचडेच्‍या स्‍थितीबद्दल बोलताना माजी नगराध्‍यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बाळकृष्‍ण (पिंटी) होडारकर यांना विचारले असता, येणाऱ्या पालिका निवडणुकीत उभे राहण्‍यासाठी कित्‍येकजण इच्‍छुक असून त्‍यामुळे उमेदवारांची गर्दी वाढणार आहे आणि ही गर्दी भाजपासाठी निश्चितच डाेकेदुखी ठरू शकते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मागच्‍यावेळी पालिका निवडणूक झाल्‍यानंतर १४ नगरसेवकांनी भाजपला समर्थन दिले असले, तरी ते सगळेच काब्राल यांनी उभे केलेल्‍या पॅनलमधून जिंकून आलेले नव्‍हते. त्‍यावेळी काब्राल हे मंत्री असतानाही त्‍यांनी उभे केलेल्‍या पॅनलमधील फक्‍त पाचजणच जिंकून आले होते आणि या गोष्‍टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

सात नगरसेवक कुणाबरोबर?

कुडचडे पालिका ही १५ नगरसेवकांची असून त्‍यापैकी १४ नगरसेवक आपण भाजप समर्थक, असा दावा करत आहेत. मात्र, त्‍यातील ४ नगरसेवक सध्‍या उघडपणे रोहन गावस देसाई यांच्‍याबरोबर फिरू लागले आहेत, तर काब्राल यांच्‍या कट्टर समर्थकांची यादी तयार केल्‍यास ती केवळ २ येऊन थांबते. त्‍यामुळे अन्‍य सात नगरसेवक कुणाबरोबर असतील याची सध्‍या चर्चा सुरू असून येत्‍या पालिका निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्‍छुकांची गर्दीही वाढणार असल्‍याने येणाऱ्या पालिका निवडणुकीत या उमेदवारांवर काब्राल यांचे वर्चस्‍व असेल की रोहनचे हाच त्‍यामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT