Crime branch seizes liquor boxes in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

Cuncolim Kiquor Smuggling: लीजवर दिलेल्या ट्रकाचा वापर बेकायदा दारू तस्करीसाठी करण्याची खळबळजनक घटना कुंकळ्ळी येथे उघडकीस आली आहे. या ट्रकात लाखो रुपयांची दारू सापडली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: लीजवर दिलेल्या ट्रकाचा वापर बेकायदा दारू तस्करीसाठी करण्याची खळबळजनक घटना कुंकळ्ळी येथे उघडकीस आली आहे. या ट्रकात लाखो रुपयांची दारू सापडली. ही दारू शेजारच्या राज्यांत पाठविण्यासाठी ट्रकमध्ये भरण्‍यात आली होती, असा संशय आहे.

दरम्‍यान, पोलिसांनी तपासकामाबाबत गोपनीयता ठेवली असून अधिक माहिती देणे टाळले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील तुमकूर येथील महालिंगा बी. सी. यांच्या मालकीचा हा कर्नाटक राज्य नोंदणीकृत ट्रक आहे.

दोन महिन्यांपूर्वी त्यांनी तो रमेशकुमार प्रजापत याला लीजवर दिला होता. त्याचे पैसेही येणे बाकी होते. गेले दोन महिने प्रजापत हा महालिंगा याचा कॉलही घेत नव्हता. शेवटी त्यांनी जीपीएस ट्रॅकरचा आधार घेतला असता त्यांना आपला ट्रक कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीत असल्याचे आढळून आले.

मागाहून त्यांनी या प्रकरणी गोवा पोलिसांना ही माहिती दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता ट्रकमध्ये दारू आढळली. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT