cuncolim fish plant protest Dainik Gomantak
गोवा

फिश मिल प्लांटला कुंकळ्ळी पालिकेचा नकार, सरकारने दुर्लक्ष केल्यास थेट आंदोलनाचा इशारा; LoP युरी

Cuncolim fish meal plant issue: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एका नव्या फिश मिल प्लांटच्या प्रस्तावाला कुंकळ्ळी नगरपालिकेच्या सर्व १४ सदस्यांनी एकमताने नकार दिला

Akshata Chhatre

मडगाव: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एका नव्या फिश मिल प्लांटच्या प्रस्तावाला कुंकळ्ळी नगरपालिकेच्या सर्व १४ सदस्यांनी एकमताने नकार दिला आहे. नगरपालिकेच्या या निर्णयाचे कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मनापासून स्वागत केले आहे.

आधीच प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या या परिसरात नव्या प्रकल्पाला विरोध करत, आमदार आलेमाव यांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना सरकार प्राधान्य देत असल्याचा आरोप केला होता.

या प्रस्तावाविरोधात आमदार आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला (GSPCB) पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी नमूद केले होते की, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील सध्याचे फिश मिल प्लांट कोणत्याही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाशिवाय (Effluent Treatment Plant) कार्यरत आहेत.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, स्थानिक लोकांच्या आरोग्याला आणि नैसर्गिक जलस्रोतांना धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

"स्थानिक लोकांनी या प्रकल्पांच्या विरोधात अनेक वर्षे आंदोलन केले आहे. मी देखील या प्रकल्पांच्या हानिकारक प्रभावाबद्दल सतत चिंता व्यक्त केली आहे," असे आमदार आलेमाव यांनी पत्रात म्हटले होते.

नगरपालिकेच्या सदस्यांनी घेतलेला हा निर्णय हा लोकांच्या हितासाठी महत्त्वाचा असून, जर सरकारने लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष केले, तर आपण लोकांच्या हक्कांचे आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आंदोलन करू, असा इशाराही आमदार आलेमाव यांनी दिला आहे. नगरपालिकेच्या या एकमताने घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT