Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Yuri Alemao: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील फिश मिल प्रकल्पांमुळे आधीच प्रदूषण होत असल्याने आता नव्याने एका फिश मिल प्लांटला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याची मागणी आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील फिश मिल प्रकल्पांमुळे आधीच प्रदूषण होत असल्याने आता नव्याने एका फिश मिल प्लांटला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याची मागणी आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्र लिहिले आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील विद्यमान फिश मिल प्लांट, ॲफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांटशिवाय सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून लोकांच्या आरोग्यासह नैसर्गिक जलस्रोतांनाही धोका निर्माण झाला आहे.

Yuri Alemao
Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

स्थानिक लोकांनी या प्रकल्पांच्या विरोधात अनेक वर्षे आंदोलन केले आहे. या प्रकल्पांच्या हानिकारक प्रभावाबद्दल मी सतत चिंता व्यक्त केली आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अधिवेशनात फिश मिल प्रकल्पांना प्रोत्साहन देणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

आरोग्यविषयक समस्यांत वाढ

आलेमाव यांनी सांगितले, की बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात, या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्याची समस्या, कर्करोग, दीर्घकालीन मूत्रपिंड रोग आणि सोरायसिसमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे.

२८ लोक श्वसन समस्यांनी त्रस्त आहेत. २९ लोकांना त्वचेची ॲलर्जी, ११ लोकांना दम्याच्या त्रास, एका व्यक्तीस दीर्घकालीन मूत्रपिंड रोग, ८ लोकांना सायनस, एका व्यक्तीला सोरायसिस आहे आणि इतरांनी धुळीच्या ॲलर्जीमुळे डोळ्यांत जळजळ होण्याची तक्रार केली आहे, असे युरी यांनी पत्रात म्हटले आहे.

Yuri Alemao
Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

सरकारी कार्यपद्धतीबाबत चिंता

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाशिवाय नवीन कारखाने उभारले जाणार नाहीत, असा विश्वास जनतेला आणि मला होता. मात्र, गोवा-आयपीबीने नुकतीच परवानगी दिल्याने सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता आणि शंका निर्माण झाल्या आहेत. परवानगी रद्द करण्याचा निर्णय हा परिसर आणि तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा हिताचा असेल, असेही आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com