Cuncolim Blind Woman Harassment Dainiak Gomantak
गोवा

कुंकळ्ळीत माणुसकीला काळिमा! अंध नातेवाईक महिलेचा अमानवीय छळ; जेवण-औषधांसाठी पैशांची मागणी केल्यानं अमानुष वागणूक

Cuncolim Blind Woman Harassment: कुंकळ्ळी येथे माणुसकीला काळिमा लावणारी एक घटना घडली असून आपल्याच नात्यातील एका अंध महिलेचा छळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: कुंकळ्ळी येथे माणुसकीला काळिमा लावणारी एक घटना घडली असून आपल्याच नात्यातील एका अंध महिलेचा छळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच करवाई करताना भिकू देसाई व त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल पागी पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंकळ्ळी येथील बेकलेमवाडा येथील अंध महिलेला जेवण व उपचारासाठी पैसे नाकारत तिचा छळ करण्यात येत होता. तसेच शौचालय बंद करून उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी पाठविले जात होते. ही घटना २८ एप्रिलपूर्वीची असून पीडित महिला ही पूर्णपणे अंध असून ती संशयितांची नातेवाईक आहे. पीडित अंध महिला जेव्हा संशयिताकडे जेवण आणि वैद्यकीय उपचारांसाठी पैसे मागण्यास गेली, तेव्हा संशयितांनी तिला शिवीगाळ करत धमकावले होते.

संशयितांनी पीडित महिला वापरत असलेल्या शौचालयात माती टाकून ते कुलूप लावून बंद केले होते. यामुळे पीडितेला नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जाणे भाग पडत होते. हा प्रकार असह्य झाल्याने तिने आपल्या बहिणीला या सर्व गोष्टी कथन केला व शेवटी या अत्याचाराला वाचा फुटली. मूलभूत गरजांपासून वंचित ठेवून तिला अमानवीय वागणूक दिल्याचा ठपका संशयितांवर ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT