Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

Goa High Court: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूरदत्तक आईची हत्या केल्याचा आरोप असलेल्या प्रथमेश नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Goa High Court conditional bail
Goa CrimeDainiak Gomantak
Published on
Updated on

पणजी: दत्तक आईची हत्या केल्याचा आरोप असलेल्या प्रथमेश नाईक याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपी गेल्या चार वर्षांपासून कोठडीत असून खटल्याची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याची दखल न्यायालयाने घेतली. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी बुधवारी हा आदेश दिला.

कुडचडे पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या या गुन्ह्यात २८ मार्च २०२२ रोजी नाईकला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दुसरी अल्पवयीन आरोपी, जिचे नाईकसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे, तिच्यावर बाल न्यायालयात स्वतंत्रपणे खटला सुरू आहे.

Goa High Court conditional bail
Goa Crime: बाणावलीत खुनी हल्ला! पार्किंगच्या वादातून 32 वर्षीय तरुणावर चाकूने वार; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, दत्तक आईने आरोपीच्या एका अल्पवयीन मुलीसोबत असलेल्या संबंधांना विरोध केला होता. २८ मार्च २०२२ रोजी तिचे पती कामावर गेल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात तिच्यावर हल्ला केला, ज्यात तिचा मृत्यू झाला. नाईकच्या कथित कबुलीजबाबानुसार घरामागील विहिरीतून हत्येसाठी वापरण्यात आलेली लोखंडी सळई जप्त करण्यात आली होती. तसेच रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी हस्तगत केले होते.

दरम्यान, नाईकची बाजू मांडणारे वकील रायन मिनेझिस यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, संपूर्ण प्रकरण हे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. घटनास्थळी आरोपी उपस्थित असल्याचे सिद्ध करणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा ठोस पुरावा उपलब्ध नाही. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार टी-शर्टवर मानवी रक्त आढळले असले तरी ते मृत व्यक्तीच्या रक्ताशी जुळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. नाईक २०२२ पासून न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचावपक्षाने केली.

Goa High Court conditional bail
Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

न्यायालयाचे निरीक्षण

आरोपपत्राचे परीक्षण केल्यानंतर न्यायमूर्ती गोखले यांनी नमूद केले की, लोखंडी सळई आणि कपड्यांच्या जप्तीव्यतिरिक्त आरोपी गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित होता, असे दर्शवणारा अन्य कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असला तरी आरोपी चार वर्षांपासून तुरुंगात आहे. अद्याप आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवायची बाकी असून खटला पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराहून अधिक कालावधी लागू शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com