Shantadurga Temple Goa Dainik Gomantak
गोवा

Shantadurga Temple Goa: शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण जत्रोत्सवास मोठ्या भक्तीभावाने सुरुवात

Shantadurga Temple Goa: फातर्प्यात पाच दिवस चालणाऱ्या जत्रोत्सवाची धूम असणार आहे.

दैनिक गोमन्तक

Shantadurga Temple Goa: फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जत्रोत्सवाला मंगळवारी पंचमीने उत्साहात सुरुवात झाली. देवीला महाभिषेक करून देवीचे वांगडी असलेले बारा गावकार नमनाला बसून जत्रोत्सवाला आरंभ झाला. रात्री विधिपूर्वक नमन, शिबिकोत्सव, आरती झाल्यावर देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

रविवारपर्यंत या जत्रोत्सवाची धूम असणार आहे. बुधवार, 28 रोजी सकाळी धार्मिक विधी, देवीला महाभिषेक अर्पण केला जाईल. रात्री दहा वाजता देवीची अंबारी रथातून मिरवणूक काढण्यात येईल. गुरुवार, 29 रोजी धार्मिक विधी, महाभिषेक, शिबिकोत्सव व जागर झाल्यावर देवीची फुलांच्या रथातून मिरवणूक काढण्यात येईल.

शुक्रवार, 30 रोजी देवी विजय रथावर विराजमान होणार असून देवीची विजय रथातून मिरवणूक काढण्यात येईल. शनिवार, 31 रोजी सकाळी धार्मिक विधी, जागर व इतर विधी झाल्यावर रविवार, 1जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता देवीची महारथातून मिरवणूक काढण्यात येईल.

रविवारी रात्री पालखी, जागर व इतर धार्मिक विधीने जत्रोत्सवाची सांगता होईल. सोमवार, 2 ते शुक्रवार, 6 जानेवारीपर्यंत देवीला अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंची पावणी करण्यात येणार आहे. जत्रोत्सवानिमित्त भरलेल्या मोठ्या फेरीचे सर्वांनाच आकर्षण आहे.

नवसाला पावणारी देवी

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मागणीची देवी किंवा नवसाला पावणारी देवी म्हणून कुंकळ्ळीकरिणीची ख्याती असून देवीचे भक्त जत्रोत्सवाला हमखास उपस्थित राहतात. या जत्रोत्सवाला केवळ हिंदूच नव्हे, तर ख्रिस्ती भाविकही आवर्जून उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. धार्मिक सौहार्दाचे प्रतीक, अशी या जत्रेची ख्याती आहे.

आंगवण फेडण्यासाठी भक्तांची गर्दी

देवीच्या मागणीच्या भक्तांनी पंचमीला उपस्थित राहून देवीला भेट अर्पण केली. महाजनांमध्ये देवीच्या भेटवणीची प्रथा असून अंबारी रथ झाल्यावर महाजन देवीची केळी भेट घेणार आहेत. देवीकडे केलेली आपली मागणी पूर्ण झाल्यामुळे आंगवण फेडण्यासाठी अनेक भक्त पंचजत्रेला उपस्थित झाले. जत्रोत्सवानिमित्त मंदिर विद्युत रोषणाईने सजविले असून सालंकृत खास पैठणीतील देवी कुंकळ्ळीकरिणीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT