गणेश मूर्तिकार संदेश हरमलकर आणि त्यांचे सोबती  Dainik Gomantak
गोवा

Goa: 'मेहनत घेतली तर मातीला हवा तसा आकार देता येतो';संदेश हरमलकर

दैनिक गोमन्तक

मोरजी: चिकण माती मातीपासून(Chicken soil) मोरजी तालुक्यातील (Morji taluka)संदेश हरमलकर (Sandesh Harmalkar) गणेश मुर्ती बनवण्याची आपली कला जोपासत आहे. ही कला पुढच्या पिढीने चालवावी आणि त्यातून आपल्या कलेला वेगवेगळे कंगोरे देत तिची प्रगती व्हावी. अशी जाणकार कलाकारांची मनोमन इच्छा असते. या कलेचा वारसा प्रत्येक कलाकाराचा वारसदार हा जपेलच याची अलीकडच्या काळात शाशवती राहिली नाही. परंतु देऊळवाडा मांद्रे येथील युवा मूर्तिकार संदेश हरमलकर मात्र आपल्या पारंपारिक कलेचा वारसा आपली नोकरी सांभाळूनही चालवत आहे. केवळ चिकण मातीचा वापरून ते दरवर्षी लहानमोठ्या गणेश मुर्त्या बनवत आहेत.

संदेश हरमलकर म्हणतात, मातीत हात घातल्यानंतर मनाला शांतता मिळते. कोणतीही कला जोपासण्यापूर्वी त्या कलेची आवड आपल्याला असणे आवश्यक आहे. तरच ती कला जोपासली जाऊ शकते. पारंपारिक कला आपली प्रसिद्धी ,पैसा, वैभव मिळवून देवू शकते. त्यासाठी अगोदर आवड निर्माण करा, जाणकारांकडून मार्गदर्शन घ्या. मुलाना मातीत खेळायला द्या त्यांना मातीची आवड निर्माण होवू दे असेही ते सांगतात.

पुढे बोलताना म्हणाले, पर्यावरणाला (Environment)पूरक अशी चिकण माती आमच्याच शेतात (Farm)मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्या मातीपासून सुबक बाप्पा च्या मुर्त्या बनवता येतात. त्यासाठी थोडी मेहनत घेतली तर मातीला हवा तसा आकार देता येतो. त्यातून मूर्ती आकर्षित बनवता येऊ शकते. ही कला (Art)आजच्या पिढीला येत नाही. कारण ही कला न येण्याच्या मागे त्याचे मुख्य कारण म्हणजे हि कला केवळ दोन महिन्यासाठीच असते. आणि दहामहिने बेकार राहावे लागेल या कारणामुळे युवा पिढी पुढे येत नसावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

परंतु, या कलेला दुसरा जोड धंदा असेल तर मूर्ती बनवण्याची कला युवा पिढी चालू ठेवू शकतील. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे स्थानिक कलाकारांच्या मूर्ती संखेत वाढ झाल्याचे दिसून येते. पूर्वी अनेक बाप्पाच्या मुर्त्या बाहेरील राज्यातून आणल्या जात होत्या. मात्र आता अनेक गणेश भक्त स्थानिक मूर्तिकारांकडून मुर्त्या विकत घेतो. प्लास्टर ऑफ पेरीसच्या मुर्त्या आकर्षित आहेत मात्र आपल्या येथे आज पर्यंत कुणीही मागणी केली नाही. त्यामुळे पेडणे तालुक्यात अधिकाधिक मातीच्या मुर्त्याना प्राधान्य देण्यात येते.

मी चौगुले कंपनीत काम करतो. गणेश मुर्त्या बनवण्यासाठी एक महिना आधीच रजा घेतो. माझ्या कलेला प्राधान्य देण्यासाठी म्हणून माझा हा प्रयत्न आहे. या माझ्या चित्रशाळेत मला माझा भाऊ विनोद हरमलकर मदत करत असतो. आम्ही आमचे वडील परशुराम हरमलकर यांच्याकडून कलेचे धडे घेतले.

कोरोना काळात रंगकाम वाढलेले असून ज्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. त्यातून काही सामान खरेदी करत येते. मातीची मूर्ती हस्तकलेतून करण्यासाठी २४ तासचा अवधी लागतो मात्र साच्याचा वापर केला तर ती तासात मूर्ती बनवता येते. जर युवकांनी मन लावून गणेश मुर्त्या बनवाव्यात, आणि ही कला आत्मसात करावी असे आव्हाहन संदेश हरमलकर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT