Valpoi Dainik Gomatnak
गोवा

Valpoi News : संस्कार, शिस्त, मेहनतीची सवय लावून घ्या : परेश पै कुचेलकर

Valpoi News : वाळपईतील हेडगेवार शाळेचा बक्षीस वितरण कार्यक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, बालपणापासूनच जर योग्य संस्कार, शिस्त व मेहनत करायची सवय लागल्यास जीवन सफल होते, असे उद््गार उद्योजक परेश पै कुचेलकर यांनी काढले.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार प्राथमिक शाळेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी समुपदेशक उदय सावईकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक आमशेकर, सचिव प्रकाश गाडगीळ, मुख्याध्यापिका नीलांगी शिंदे, पालक शिक्षक समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शिनी देसाई उपस्थित आदी उपस्थित होते.

पैकुचेलकर यांनी यावेळी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. खूप कष्टाने आपण इथपर्यंत पोहोचलो असे सांगितले.

उदय सावईकर यांनी गोष्टीतून कष्टाचे फळ गोड असते हा मोलाचा सल्ला मुलांना दिला. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

तसेच शारदोत्सवाचे औचित्य साधून पालकांसाठी घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे बक्षिस वितरणही यावेळी झाले. सूत्रसंचालन शिक्षिका प्रांजल च्यारी यांनी केले. शिक्षिका निविदा देसाई यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली. आभार प्रदर्शन शिक्षक विठोबा नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खाकीला काळिमा फासणाऱ्या पोलिसांची आता खैर नाही! पर्यटकांकडून पैसे उकळणाऱ्या पाच जणांची शिक्षा हायकोर्टाकडून कायम

Baina Robbery Case: 70 लाखांचे सोने गेले कुठे? बायणा दरोड्याला 40 दिवस उलटले तरी दागिने मिळेनात; नायक कुटुंबीयांची डोळ्यात तेल घालून प्रतीक्षा!

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

SCROLL FOR NEXT