2025 Cricket Fights
2025 Cricket FightsDainik Gomantak

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

2025 Cricket Fights: क्रिकेटच्या मैदानावरील चुरस केवळ बॅट आणि बॉलपुरती मर्यादित नसते, तर अनेकदा खेळाडूंच्या भावना आणि आक्रमकता सीमा ओलांडते.
Published on

क्रिकेटच्या मैदानावरील चुरस केवळ बॅट आणि बॉलपुरती मर्यादित नसते, तर अनेकदा खेळाडूंच्या भावना आणि आक्रमकता सीमा ओलांडते. २०२५ हे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी जितके विक्रमी ठरले, तितकेच ते वादांनीही गाजले. भारत-इंग्लंड मालिका असो किंवा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, मैदानावर खेळाडू एकमेकांशी भिडले, तर कधी अंपायर आणि आयसीसीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या वर्षातील १० अशा घटना ज्यांनी क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली.

मँचेस्टरचे 'हँडशेक' नाट्य (भारत विरुद्ध इंग्लंड)

मँचेस्टर कसोटी अनिर्णित सुटण्याच्या उंबरठ्यावर असताना, बेन स्टोक्सने सामना संपवण्यासाठी रवींद्र जडेजाकडे हात पुढे केला. मात्र, जडेजाने खेळ सुरू ठेवण्याचा आग्रह धरत हस्तांदोलन करण्यास नकार दिला. या घटनेमुळे मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लाबुशेनचा 'कॅच' आणि संताप (मेलबर्न कसोटी)

जो रूटने घेतलेला मार्नस लाबुशेनचा झेल चेंडू जमिनीला लागल्याचा संशय होता. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिल्यानंतर लाबुशेनने भर मैदानात आपला संताप व्यक्त केला, ज्यामुळे मैदानावरील शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला.

गौतम गंभीर विरुद्ध पिच क्युरेटर (ओव्हल)

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हलचे क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात खेळपट्टीच्या पाहणीवरून शाब्दिक चकमक झाली. क्युरेटरने गंभीरला खेळपट्टीच्या जवळ जाण्यापासून रोखल्याने हा वाद विकोपाला गेला होता.

सिराजचा आक्रमक अवतार आणि दंड (लॉर्ड्स)

बेन डकेटला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजने केलेले आक्रमक सेलिब्रेशन त्याला महागात पडले. आयसीसीने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सिराजला सामना शुल्काच्या १५% दंड ठोठावला.

2025 Cricket Fights
Goa Protest: '..ही लूट थांबवा'! शेळ- लोलये टोल नाक्यावर नागरिकांचे आंदोलन; ई-चलनच्या नावाखाली वसुली होत असल्याचा आरोप

'ग्रोव्हल' शब्दावरून रणकंदन

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी भारताविरुद्ध 'ग्रोव्हल' हा शब्द वापरल्याने भारतीय क्रिकेट वर्तुळात संतापाची लाट उसळली. अनिल कुंबळे आणि चेतेश्वर पुजारा यांनी या शब्दाला अपमानास्पद मानून त्यावर कडक आक्षेप नोंदवला.

ड्यूक्स बॉलच्या गुणवत्तेवरून वाद (लॉर्ड्स टेस्ट)

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी भारताविरुद्ध 'ग्रोव्हल' (लोळण घेणे) हा शब्द वापरल्याने भारतीय क्रिकेट वर्तुळात संतापाची लाट उसळली. अनिल कुंबळे आणि चेतेश्वर पुजारा यांनी या शब्दाला अपमानास्पद मानून त्यावर कडक आक्षेप नोंदवला.

विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टस टक्कर (एमसीजी टेस्ट)

विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टस टक्कर (एमसीजी टेस्ट) २०२५-२६ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान, विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टस यांच्यात खांद्याची टक्कर झाली. यामुळे मैदानावर मोठा गोंधळ उडाला.

अ‍ॅडलेड टेस्टमध्ये डीआरएस आणि स्निको फेल

अ‍ॅडलेड टेस्टमध्ये डीआरएस आणि स्निको फेल अ‍ॅशेस मालिकेतील अ‍ॅडलेड टेस्टमध्ये अ‍ॅलेक्स कॅरीला 'अल्ट्रा-एज' स्पाइक असल्याचे दाखवण्यात आले, परंतु त्याला नॉट आउट देण्यात आले. डीआरएसमधील या तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ झाला.

'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी' या नावावरून वाद

'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी' या नावावरून वाद भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचे नाव 'पतौडी ट्रॉफी' वरून 'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी' असे अचानक बदलण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट जगतात एक नवीन वाद निर्माण झाला.

2025 Cricket Fights
Goa Congress: जि.पं., विद्यापीठ निवडणुकांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी! LOP आलेमाव य़ांचे प्रतिपादन; विजयी उमेदवारांचा मडगावात गौरव

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडची 'वेळ वाया घालवण्याची' रणनीती

लॉर्ड्स येथे झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान, भारतीय खेळाडूंनी जॅक क्रॉलीवर अतिरिक्त षटके खेळू नयेत म्हणून जाणूनबुजून वेळ वाया घालवल्याचा आरोप केला. यामुळे शुभमन गिल आणि क्रॉली यांच्यात वाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com