Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak

Goa Accident : सरळ रस्त्यावरच बहुतांश अपघात; पोलिसांचे विश्‍लेषण

Goa Accident : अपघातप्रवण क्षेत्रांमुळेच दुर्घटना हा अपसमज
Published on

Goa Accident :

पणजी, गेल्या वर्षभरात झालेल्या जीवघेण्या रस्ते अपघातापैकी बहुतांश अपघात हे वळणदार नव्हे तर सरळ रस्त्यावर झाल्याचे पोलिसांनीच केलेल्या विश्लेषणात दिसून आले आहे. आजवर अपघात प्रवण क्षेत्रांमुळे अपघात होतात, असा समज पसरला होता. अपघातांचे विश्लेषणही त्याच अंगाने व्हायचे. मात्र, ही नवी माहिती पोलिसांनाही चक्रावून टाकणारी आहे.

वाहतूक पोलिस अपघात प्रवण क्षेत्रांची यादी सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठवतात. त्यानंतर खाते तिथे अपघात होण्याची कारणे दूर करण्याचा प्रयत्न करते, रस्ता सुधार कार्यक्रम राबवते. अपघात झाला की या दोन्ही यंत्रणांकडे नकळतपणे एकमेकांकडे बोट दाखवण्याचे प्रकार घडत असतात.

मात्र, खरोखरच रस्त्याची स्थिती अपघाताला कारण असते की, अन्य काही कारणेही कारण असू शकतात. याच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिस खात्याने गेल्यावर्षीच्या अपघातांचे विश्लेषण केले.

पोलिसांनी केलेल्या विश्‍लेषणातून वळणदार किंवा अपघात प्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंवा खड्डेमय अथवा अडथळेयुक्त अशा रस्त्यांऐवजी सरळ रस्त्यांवरच बहुतांश अपघात झाल्याचे दिसून आले आहे.

या निष्कर्षामुळे हे सरळ रस्त्यांवर होणारे अपघात कसे रोखावेत, असा प्रश्‍न पोलिस यंत्रणेपुढे आहे.

शिवाय अशा रस्त्यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी केवळ अपघात प्रवण क्षेत्रांत सुधारणा हा एकमेव कार्यक्रम राबवून उपयोगाचे नाही, हे पोलिसांच्या लक्षात आले आहे. यामुळे या उपाययोजनांवर आता पोलिस खाते काम करणार आहे.

आजवर केवळ अपघात प्रवण क्षेत्रातच अपघात होतात,असा अपसमज होता. तो या नव्या विश्‍लेषणामुळे दूर झाला आहे,असे पोलिस सूत्रांनी सांगितले. यावर रस्त्यावरील वळण हटवणे, अडथळे दूर करणे वा सुधारणा करणे हेच उपाय आहेत,हाही समज दूर ठेवावा लागणार आहे.

Goa Accident
Goa Murder Case: कर्नाटकच्या मच्छीमाराचा गोव्यात खून; उत्तर प्रदेश, ओडिशातील दोघांना जन्मठेप

सरळ रस्त्यांवरील २५७ अपघातांत २९० बळी

पोलिसांच्या आकडेवारीनुसार २५७ अपघात हे सरळ रस्त्यांवर झाले. त्यात २९० जणांनी जीव गमावला आहे. त्यात ४४ पादचारी, ४ सायकलस्वार, १७१ दुचाकीस्वार आणि २१ चारचाकी वाहनातील प्रवासी यांचा समावेश होता.

या आकडेवारीनुसार आता उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. वर्षभरात नोंद झालेल्या २ हजार ८४६ अपघातांत २ हजार ६२५ अपघात हे वाहनांची टक्कर झाल्याने झाले होते.

७६ अपघात शहरी भागात तर २१४ ग्रामीण भागात झाल्याचेही पोलिस नोंदीवरून समोर आल्याने कोठे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, हेही पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्याशिवाय जास्तीत जास्त अपघात हे सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com