CSIR NIO dummy candidate case Dainik Gomantak
गोवा

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

CSIR NIO Recruitment Exam: सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (सीएसआयआर-एनआयओ) येथे १५ जुलै रोजी झालेल्या नोकरभरती परीक्षेवेळी दोघा डमी उमेदवारांना अटक करण्‍यात आली.

Sameer Panditrao

पणजी: दोनापावल येथील सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (सीएसआयआर-एनआयओ) येथे १५ जुलै रोजी झालेल्या नोकरभरती परीक्षेवेळी दोघा डमी उमेदवारांना अटक करण्‍यात आली. प्रशासकीय नियंत्रक राकेश शुक्ला यांनी दिलेल्या पोलिसांत दिलेल्‍या तक्रारीनुसार, सुनील कुमार (२६, प्रयागराज) आणि प्रशांत कुमार (बिजनोर-उत्तर प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील आणि प्रशांत या दोघांनीही चल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोघांवर भारतीय न्यायदंड संहितेच्‍या २०२३ नुसार कलम २४२, ३१९ व कलम ३ (५) अन्वये पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर, पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, शाहीन शेट्ये, चालक विकास नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बायोमेट्रिक चाचणी

‘एनआयओ’मध्‍ये मंगळवारी स्टेनोग्राफर आणि ज्युनियर सचिवालय साहाय्यक पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. त्‍यावेळी डमी परीक्षार्थी म्हणून आलेल्या वरील संशयितांची माहिती व प्रत्यक्ष सिस्टीममध्ये असलेली माहिती वेगळी आढळली. संशयितांचे आधारकार्ड तपासले असता अधिकाऱ्यांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर बायोमेट्रिक चाचणी केल्यानंतर हे डमी उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT