Crocodile Rescue in Vasco Dainik Gomantak
गोवा

Crocodile in Vasco: वास्कोतील वाड्डेमध्ये दुसऱ्यांदा मगरीचे दर्शन; स्थानिकांनीच सापळा रचत केले बचावकार्य

मागील दोन दिवसांपूर्वी वास्कोमधील वाड्डे तलाव परिसरात एक मोठी मगर दिसली होती.

दैनिक गोमन्तक

Crocodile Rescue in Vasco: राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नद्या-नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. परिणामी पाण्यातील जीव लोकवस्तीत येण्याच्या घटनाही समोर येत आहेत. मागील दोन दिवसांपूर्वी वास्कोमधील वाड्डे तलाव परिसरात एक मोठी मगर दिसली होती.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तिथे सापळा रचला. त्यानंतर आज बुधवारी पहाटे प्राणी बचावकर्ते ग्रेसियस कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तरुणांनी तलावात दीड मीटर लांबीच्या मगरीला पकडले.

स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे याच भागात दोन दिवसांपूर्वी तलावाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला एक मोठी मगर दिसली होती.

मोठ्या आकाराची मगर आणि आणखी एक लहान मगर अजूनही तलावात असून भागातील स्थानिकांकडून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज पकडण्यात आलेल्या मगरीला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT