Crocodile in Vaddem Vasco
Crocodile in Vaddem VascoDainik Gomantak

Crocodile in Vaddem Vasco: वाड्डे वास्को येथे 7 फुटी मगरीचा वावर; स्थानिकांमध्ये घबराट, पाहा व्हिडिओ...

वन खात्याने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी
Published on

Crocodile in Vaddem Vasco: गोव्यातील वाड्डे वास्को येथे रहिवासी भागात सुमारे सात ते आठ फुट मगरीचा वावर दिसून आला आहे. येथील तळ्याच्या काठावर ही मगर दिसून आली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Crocodile in Vaddem Vasco
Nilesh Cabral: बोडगेश्वर मंदिरात भरला जनता दरबार; मंत्री निलेश काब्राल यांनी केले लोकांच्या तक्रारींचे निरसन

तथापि, लोकांनी आधीच वन खात्याला, सरकारला याबाबत माहिती कळवली आहे. पण त्यावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. या मगरीचा व्हिडिओही स्थानिकांनी सोशल मीडियात शेअर केला आहे. ही मगर अनेकदा स्थानिकांच्या दारापर्यंत येत असल्याचे अनुभव आले आहेत.

येथील परिसरात इतस्ततः लहान मुले खेळत असतात. हा पुर्ण निवासी परिसर आहे. त्यामुळे केवळ लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही या मगरीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वन विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

येथील सामाजिक कार्यकर्ते कायटन झेव्हियर यांनी वन खात्याने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता या मगरीला आधीच पकडून सुरक्षित अधिवासात सोडावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com