Goa Worker Crisis Dainik Gomantak
गोवा

Goa Worker Crisis: कर्तव्‍यनिष्ठेचे हेच काय ते फळ?

गोव्यातील (Goa) कंत्राटी कर्मचारी सेवेतून काढल्‍याने संकटात, संकटसमयी सेवा बजावूनही हाती केवळ प्रमाणपत्रच

दैनिक गोमन्तक

सासष्टी: कोरोना (Covid-19) महामारीच्‍या भीतीने नागरिक घरातून बाहेर पडत नव्हते. अशा स्थितीत कोविड इस्पितळात रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी काम केलेल्‍या कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांना सध्‍या कामावरून काढण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचा सरकारने केवळ संकटसमयी (Goa Worker Crisis) वापर करून घेतला, असा आरोप आके बायशचे सरपंच सिद्धेश भगत यांनी केला. कर्तव्‍यनिष्ठेचे हेच काय त्‍यांना फळ मिळाले, असा आरोप त्‍यांनी केला. सरकारने या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी त्यांनी केली. (Crisis over dismissal of contract workers in Goa)

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक विद्‍ध्वसंक झाल्याने अनेकांना आपला जीव गमावावा लागला. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारने आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर देणे आवश्यक आहे. परंतु, सरकारने संकटसमयी उपयुक्त ठरलेल्या ईएसआय इस्पितळात काम करणाऱ्या ३५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांना एक प्रमाणपत्र देऊन कामावरून काढून टाकण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे सिद्धेश भगत यांनी सांगितले.

35 कर्मचाऱ्यांवर अन्‍याय

मडगाव ईएसआय इस्पितळ कोविड उपचारांसाठी सुरू केल्यावर कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी 70 मल्‍टिटास्किंग कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केले होते. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी जिवाच्या भीतीने काम सोडले, तर 35 कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता, कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी निष्ठेने काम केले आहे. या कर्मचाऱ्यांचा सरकारने पूर्णपणे वापर केला असून सरकारलाच तिसऱ्या लाटेवेळी उपयुक्त ठरणाऱ्या ‘योद्ध्यांवर’ अन्याय केला, असे सिद्धेश भगत यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा

या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोविड नियंत्रणात आणण्यासाठी लढणाऱ्या बिगर सरकारी संस्था तसेच गोमंतकीयांना पाठिंबा देणे महत्त्‍वाचे आहे. यासंबंधी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व राज्यपालांना निवेदन सादर केले आहे. सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे सिद्धेश भगत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT