Goa: लाडली लक्ष्मी’ स्वीकृतीपत्रांसाठी कार्यालयात तोबा गर्दी

गोव्यात (Goa) पुन्हा वास्तवाचे भान विसरून लोकांनी रस्ते, कार्यालये, किनाऱ्यांवर एकच गर्दी करणे सुरू केले आहे.
Ladli Lakshmi acceptance letter in Goa
Ladli Lakshmi acceptance letter in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोविडविषयक नियम शिथिल करण्याचा अवकाश, राज्यात (Goa) पुन्हा वास्तवाचे भान विसरून लोकांनी रस्ते, कार्यालये, किनाऱ्यांवर एकच गर्दी करणे सुरू केले आहे. पर्यटकांनीही नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणी घोळके करण्यास सुरुवात केली असून, त्यांना कोणताही धरबंद राहिलेला नाही. (Stormy crowd at the office to get Ladli Lakshmi acceptance letter in Goa)

लाडली लक्ष्मी योजनेची स्वीकृती पत्रे घेण्यासाठी सोमवारी लाभार्थींनी महिला आणि बालकल्याण खात्याच्या कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे अनेक लाभार्थी लहान मुलांना सोबत घेऊन रांगेत उभ्या होत्या. एकीकडे कोविडच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसेल असे सांगितले जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

Ladli Lakshmi acceptance letter in Goa
Goa: लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणींनी निसंकोचपणे पुढे यावे

या योजनेतील लाभार्थींची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्याचे स्वीकृती पत्र घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण पत्र वितरणासाठी खात्याने कोणत्याच प्रकारचे नियोजन केले नव्हते. लाभार्थींनी एकाच वेळी कार्यालयात मोठी गर्दी केली. त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांना पाचारण करून गर्दी आवरण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण कोणी कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. गोंधळामुळे पत्र वितरणाच्या कामातही वारंवार व्यत्यय येत होता. परिणामी, लाभार्थ्यांना कार्यालयाबाहेर ताटकळत थांबावे लागले.

अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांच्या संख्येची कल्पना होती. तरीही केवळ एकाच टेबलावरून पत्र वितरित केली जात होती. खात्याच्या निष्काळजीपणामुळे कोविड नियमांचा फज्जा तर उडालाच शिवाय नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागला.

Ladli Lakshmi acceptance letter in Goa
Goa Monsoon Update: दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

"अनिर्बंध गर्दी कोविडच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे. राज्यात पर्यटक बेजबाबदारपणे वागून गोमंतकीयांचे आरोग्य धोक्यात घालत असतील, तर त्यांच्यावर सरकारने निश्चितपणे कारवाई केली पाहिजे."

- ॲड. नरेंद्र सावईकर, भाजप प्रदेश सरचिटणीस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com