truck dainik gomantak
गोवा

Crime News : अंधार आणि पावसाचा फायदा घेत ट्रकांच्‍या बॅटऱ्यांची चोरी, दरवाजे तोडत ट्रकांचे केले नुकसान

ट्रकमालकांना आर्थिक फटका बसला असून, पोलिसांनी चोरट्यांना ताबडतोब पकडण्याची मागणी त्‍यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Curchorem : सावर्डे येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या ‘गोंयचे मळ’ येथे पार्क करून ठेवलेल्या अकरा खनिजवाहू ट्रकांच्या बॅटऱ्या चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्‍यामुळे ट्रकमालकांना आर्थिक फटका बसला असून, पोलिसांनी चोरट्यांना ताबडतोब पकडण्याची मागणी त्‍यांनी केली आहे.

रात्रीच्या वेळी पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरट्यानी मुख्य रस्त्याच्या आतील भागात पार्क करून ठेवलेल्या एकूण अकरा खनिजवाहू ट्रकांच्या बॅटऱ्या शुक्रवारी रात्री लंपास केल्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी काही ट्रकांचे दरवाजे तोडले तर काही ट्रकांच्या दरवाज्यांचे ग्लास फोडले. या ट्रकांमधून आठ दिवसांपूर्वी डिझेलची चोरी करण्‍यात आली होती, असे ट्रकमालकांनी सांगितले.

या प्रकरणी ट्रकमालक प्रदीप पाऊसकर यांनी कुडचडे पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. अन्‍य एक ट्रकमालक कायतान फर्नांडिस यांनी सांगितले की, या चोरीच्‍या प्रकारावरून पोलिस रात्रीच्या वेळी गस्त घालत नसल्याचे स्‍पष्‍ट होते.

यापूर्वी आपल्या ट्रकमधून दोनवेळा डिझेलची चोरी झाली होती. आता तर बॅटरी चोरून नेली. हा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. काम नसल्याने ट्रक बंदच आहेत. त्‍यामुळे अगोदरच आर्थिक परिस्थिती खालावली असताना चोरट्यानी आमच्या ट्रकांच्या बॅटऱ्या चोरण्याचे सत्र आरंभले आहे. पोलिसांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

- हेमंत नाईक, ट्रकमालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Parab Resign: राज्याच्या राजकारणात खळबळ! मनोज परब यांनी दिला 'आरजीपी'चा राजीनामा

Goa politics: सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; मडगाव पालिका बैठक, सरदेसाईंच्या प्रस्तावित विकासकामांवरून वाद

Goa Political Election: गोव्यात भाजप 30 पेक्षा अधिक जागा जिंकेल! केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक योजनांचा घेतला आढावा

Goa Accident: गोव्यात तामिळनाडूच्या पर्यटकांच्या कारला बसची जोरदार धडक, गरोदर महिलेसह 5 जण जखमी; फरार बस चालकाला पोलिसांनी फार्मागुडीत पकडलं

Goa Economic Frauds: 'अष्टगंधा'मध्‍ये 11 कोटींचा घोटाळा; प्रकाश कांदोळकर अटकेत, आकर्षक परताव्यांचे आमिष

SCROLL FOR NEXT