Valpoi News : लक्ष्मीला मिळाली नवी दृष्टी; महाआरोग्य शिबिरांमुळे रुग्णांना दिलासा

शिबिरात झाल्याने त्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेता आले
Mahaarogya camps provide relief to patients
Mahaarogya camps provide relief to patientsDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi : सत्तरी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी आरोग्य खात्यातर्फे बाराही ग्रामपंचायतींसह वाळपई नगरपालिका क्षेत्रात महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरांत अनेक लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली होती. शिंगणे येथील ज्येष्ठ महिला लक्ष्मी गावस यांना दृष्टीदोष होता. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याचे निदान शिबिरात झाल्याने त्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेता आले. आता त्यांना व्यवस्थित दिसू लागले आहे.

लक्ष्मी गावस यांचा मुलगा मोहन गावस यांनी सांगितले की, माझ्या आईला गेले चार वर्षे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे दैनंदिन जीवनात तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अनेकदा ती चालताना पडायची. हल्लीच नगरगाव सरकारी माध्यमिक शाळेत आरोग्य खात्यातर्फे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.

Mahaarogya camps provide relief to patients
Valpoi News : अडवईत नैसर्गिक पद्धतीने भाजी लागवड; सयाजी देसाई यांची स्वयंरोजगाराकडे वाटचाल

त्यावेळी सरपंच संध्या खाडिलकर यांनी या शिबिरात आईला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार मी आईला घेऊन शिबिरात सहभागी झालो. त्यावेळी डाॅक्टरांनी तपासणी केली. तिच्या डोळ्यांत मोतिबिंदू असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वाळपई आरोग्य केंद्रात सर्व तपासण्या केल्या. फोंडा येथील सरकारी इस्पितळात सर्व उपचार करण्यात आले. उपचारानंतर तिचे डोळे चांगले झाले. याबद्दल आम्ही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आभारी आहोत.

Mahaarogya camps provide relief to patients
Valpoi Accident: अचानक बैल आडवा आला, अन कार झाली पलटी; वाळपईत अपघात

आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

सरपंच संध्या खाडिलकर म्हणाल्या की, शिंगणे गावातील ज्येष्ठ महिला लक्ष्मी गावस यांना दृष्टीदोष निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना दिसत नव्हते. त्यांना आरोग्य खात्याच्या शिबिरात तपासणीसाठी नेले. योग्य उपचार झाल्याने त्यांना आता व्यवस्थित दिसू लागले आहे. यावेळी लक्ष्मी गावस यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. योग्य उपचाराबद्दल त्यांनी आरोग्य खाते आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com