गोमंतकीय खलाशी मालवाहू जहाजांवर काम करतात, ते पुन्हा नोकरीवर रुजू होऊ लागले आहेत. पण, सदर जहाजांचे मालक या खलाशांना नोकरीवर घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. कारण, भारतात मोठ्या प्रमाणात सापडणारे कोरोनाचे रुग्ण आणि लसीकरणाला झालेला उशीर हे आहे. जहाजांवरील त्यांच्या जागा इतर देशांतील नागरीक पटकावू लागले असून त्यात खास करून चिनी आणि दक्षिण पूर्व देशांतील नागरिकांचा समावेश आहे, असे मरीन इंजिनियर व ‘गोंयचो आवाज’ पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य विवेकानंद कंटक यांनी सांगितले. (Sailors in Goa have been unemployed during the Covid19 period)
जगभरात आज आंतरराष्ट्रीय खलाशीदिन साजरा केला जाणार आहे. गोव्यातही पूर्वीपासून खलाशी वर्गाची संख्या मोठी राहिलेली आहे. कोरोना महामारीमुळे ज्या अनेक क्षेत्रांना जबरदस्त धक्का बसला, त्यात खलाशांचाही समावेश होतो. कित्येक गोमंतकीय खलाशांना नोकऱ्या सोडून यावे लागले आणि परत नोकरी मिळण्याच्या बाबतीतही अडचण निर्माण झाली आहे. मात्र, राज्य सरकारने शेवटी त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिल्याने पुन्हा रोजगार मिळविण्याच्या बाबतीत त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. इंटरनॅशनल मरिटाईम ऑर्गनायझेशन संस्थेकडून 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय खलाशीदिन साजरा केला जातो.
लसीकरणात प्राधान्य दिल्याने दिलासा
विदेशात परिस्थिती निवळू लागल्यानंतर जहाज कंपन्या कामावर रूजू होण्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मागू लागल्या. त्यामुळे खलाशांसमोर परत नोकरी मिळण्याच्या बाबतीत अडचणी उभ्या झाल्या. त्याची दखल घेऊन खलाशांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी अनेक नेत्यांनी तसेच खलाशांच्या संघटनेने लावून धरली होती. त्यानुसार शेवटी खलाशांचे लसीकरण पूर्ण करण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिल्याने त्यांचा एक प्रश्न मार्गी लागलेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.