keri sattari Dainik Gomantak
गोवा

गोव्यात प्रवेशासाठी अजूनही कोविड निगेटिव्हची सक्ती

आज प्रत्यक्ष केरी सत्तरी ( keri sattari) चेक नाक्यावर कोविड निगेटिव्ह अहवालाची (Covid Negative Report) सक्ती केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने परराज्यातून गोव्यात (Goa) प्रवेश करण्यासाठी कोविड 19 (Covid 19) च्या दोन्ही लसी घेतलेल्याना प्रवेश द्यावा असा आदेश दिला असताना तसेच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr Pramod Sawant) यांनीही याचा पुनउल्लेख केला असताना आज प्रत्यक्ष केरी सत्तरी ( keri sattari) चेक नाक्यावर कोविड निगेटिव्ह अहवालाची (Covid Negative Report) सक्ती केली जात आहे. केरी चेक नाक्यावर अजूनही कडक तपासणी केली जाते.

ज्यांच्याकडे कोविडचे निगेटिव्ह अहवाल असलेल्यांना गोव्यात प्रवेश दिला जातो. यासंबंधी चेक नाक्यावर तैनात असलेल्या वाळपई( valpoi) उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकाऱ्यांनी सांगितले की उपजिल्हाधिकारी कार्यालायकडून आम्हाला असा कोणताही आदेश आला नसल्याने आम्ही अशी सूट देत नाही. पूर्वीच्या आदेशाचे आम्हाला पालन करावे लागते असे सांगितले.

दरम्यान सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयाचा हवाला देत बरेच पर्यटक व अन्य वाहतूकदार केरी नाक्यावरील पोलिस व इतर कर्मचारी वर्गाकडे हुज्जत घालताना दिसतात. पण बिना कोविड निगेटिव्ह अहवालाप्रवेश नसल्याने त्याच ठिकाणी असलेल्या कोविड तपासणी केंद्रात तपासणी करून अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर प्रवेश होतो. सद्य कोविड तपासणी केंद्रात मोठी गर्दी असते.

कोविड चाचणी साठी भर पावसात रांगा

केरी सत्तरी येथील कोविड चाचणी केंद्रात कोविड चाचण्यासाठी मोठी गर्दी असते. या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने या ठिकाणी कोविड चाचणीसाठी थांबायला निवारा नसल्याने पर्यटकांना भर पावसात कोविड चाचण्यासाठी उभे राहावे लागते. तसेच पाऊस चुकवण्यासाठी येथे गर्दी ही होत असते त्यामुळे इथले सामाजिक अंतराचे तीन-तेरा वाजतात. तसेच पर्यटकांना बरेच हाल सोसावे लागतात. त्यामुळे येथे एका निवाऱ्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘एका रातीन आनी एका वातीन, माका देऊळ बांधून जाय’! शेकडो वर्षांची परंपरा असलेली पेडण्याची 'पुनाव'

Supreme Court On Cricket: 'क्रिकेट' आता खेळ नाही, केवळ व्यवसाय! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

SCROLL FOR NEXT