Goa: केरी सत्तरीत वाहतूक पोलिसांचाच जीव धोक्यात

सद्य केरी सत्तरीतील( keri Satari ) वाहतुक पोलिस घेत आहेत. याला कारण आहे, हा नाका ठिकाण अपघात प्रणव क्षेत्रात असल्याचे.
keri Satari
keri Satari Dainik Gomantak
Published on
Updated on

रस्त्यावर अपघात घडू नये किंवा रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी कार्यरत असलेले राज्य वाहतूक पोलीस दलाचे ( goa traffic police cell) पोलिसच जीव मुठीत धरून काम करीत असल्यास त्याला काय म्हणावे. असाच अनुभव सद्य केरी सत्तरीतील( keri Satari ) वाहतुक पोलिस घेत आहेत. याला कारण आहे, हा नाका ठिकाण अपघात प्रणव क्षेत्रात असल्याचे.

येथे, केरी चेक नाक्याच्या वरच्या बाजूला काही अंतरावर वाहतूक पोलिसांचा नाका आहे. पण ही जगाच अपघात प्रणव क्षेत्रात येते. कारण ही जागा चोर्ला घाटातून येणाऱ्या रस्त्याच्या उतरणीवर आहे. तसेच उतरणीच्या वरच्या बाजूला एक मोठे वळण ही आहे त्यामुळे ते आणखी धोकादायक ठरते. चोर्ला घाटातून भरधाव वेगाने येणारी वाहनाना या वळणामुळे या चेक नाक्याचा अंदाज येत नाही त्यामुळे त्यांना अचानक ब्रेक लावून गाड्या थांबवाव्या लागतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे जीव मुठीत ठेवून काम करीत आहेत.

keri Satari
Goa: केरी सत्तरी चेक नाक्यावर पर्यटकांची गर्दी

चार महिन्या पूर्वी घडला होता एक अपघात

या नाक्यावर चार महिन्या पूर्वी असाच एक अपघात झाला आहे. घाटातून येणाऱ्या एका ट्रकच्या पहिल्यांदाच चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा संयम गेल्याने तिथे ड्युटीवर असलेल्या एका पोलिसांच्या पायावरून ट्रकचे चाक गेले, त्यामुळे त्याचा पाय मोडला. ही घटना भर दिवसा घडली होती. रात्रीच्या वेळी तर हा धोका आणखी वाढतो. त्याचप्रमाणे याठिकाणी इतर ही लहान मोठे अपघात झालेले आहे. यापैकी एक ट्रक येथे बाजूलाच असलेल्या दुकानाला धडक दिली होती.

केरी चेक नाक्यामुळे वाढला धोका

दरम्यान हा वाहतूक पोलिस नाका केरीतील पोलिस तपासणी नाक्याच्या वरच्या बाजूला आहे. सद्य गोव्यात प्रवेशासाठी प्रवासी व वाहनांची तपासणी केली जाते. त्यासाठी येथे येणाऱ्या प्रत्येक वाहने थांबतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. अशा या रांगामुळे वाहतूक नाक्याच्या समोर सतत गाड्या उभ्या असतात. अशा वेळी जर एखादे अवजड वाहनाचा ब्रेक निकामी झाल्यास मोठा अनर्थ होण्याची संभावना आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष वेधून हा नाका सुरक्षित स्थळी हलवावा अथवा सुरक्षतेचे उपाय आखावे व पोलिसांनी सुरक्षा द्यावी.

keri Satari
केरी समुद्रकिनाऱ्यावरील टेट्रापॉडची संरक्षक भिंत कोसळण्याच्या मार्गावर

वाहतूक पोलिस दलासाठी माडाच्या झावळ्याचा झोपडीचा निवारा

दरम्यान या वाहतूक पोलिस नाक्यावर पोलिसांना बसण्यासाठी माडाच्या झावळ्याची शेड उभारली आहे. येथून पोलिस तपासणी नाका आणि कोविड तपासणीसाठी सरकारने पत्राची शेड उभारली आहे व त्यात विजेची सोय आहे पण वाहतूक पोलिसांची शेड साधीच असून त्यात वीज, पिण्याचे पाणी, शौचालय आदीची काहीच सोय नाही.

keri Satari
केरी-सत्तरीत गव्याकडून शेतीचे नुकसान

पार्किंगची नाही व्यवस्था

हा वाहतूक पोलिसाच्या नाक्याच्या दोन्ही बाजूनी गाड्यांचा पार्किंगची अजिबात व्यवस्था नाही. जेव्हा चोर्ला घाटातून येणारे वाहन तपासणीसाठी येथे थांबतात तेव्हा त्यांना रस्त्यावरच राहावे लागते. बऱ्याच वेळा गाड्यांचे अपुऱ्या कागदपत्रे किंवा इतर कारणास्तव वाहने बाजूला ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने किंवा येथे गाड्या वळवायला जागा नसल्याने मोठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com