Court Dainik Gomantak
गोवा

Cash For job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणातील संशयित शिवम पाटीलला कोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

Shivm Patil Bail: सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणातील वास्को पोलिसांनी अटक केलेल्या शिवम पाटील या संशयिताला न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणातील वास्को पोलिसांनी अटक केलेल्या शिवम पाटील या संशयिताला न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

पोलिसांनी या संशयिताला नोकरी घोटाळा गुन्ह्यासाठी अटक केली होती. अटकेनंतर या संशयित आरोपीने आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे यासाठी वास्को न्यायालयाकडे अर्ज केला होता.वास्कोच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हा अर्ज सुनावणीस आला असता पोलिसांनी या अर्जाला विरोध केला.

सरकारी नोकरी देतो असे सांगून संशयिताने अनेकांना गंडा घातलेला आहे. आणखी किती जणांकडून या संशयिताने रक्कम घेतली आहे, हे जाणून घेण्यासाठी संशयित पोलिस कोठडीत पाहिजे, असा युक्तिवाद वास्को पोलिसांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. या संशयिताला जामिनावर सोडल्यास अशा प्रकरणासंबंधी आणखी कोणी पीडित असल्यास ते तक्रारी करण्यासाठी पुढे येणार नाहीत, असाही सरकार पक्षातर्फे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला.

सरकारी नोकरी देतो असे सांगून ज्या पिडितांकडून या संशयिताने रक्कम घेतलेली आहे त्यांची रक्कम या संशयिताने कोठे गुंतविली आहे, त्याची पडताळणी करायची आहे. संशयिताला जामिनावर सोडल्यास या प्रकरणासंबंधीचा पुरावा नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयिताची किती मालमत्ता आहे.

तसेच बँक व्यवहारासंबंधीची माहिती जाणून घ्यायची आहे. यासाठी संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि या संशयिताला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. न्यायालयाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतरच अर्जदाराला जामिनावर सोडण्यात यावे असेही न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे.

न्यायालयाने घातलेल्या अटी

या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्याला गरज भासेल तेव्हा चौकशीसाठी अधिकाऱ्यापुढे हजर राहावे, संशयिताने फरारी न होता चौकशी अधिकाऱ्याला तपासासाठी सहकार्य करावे. तसेच न्यायालय जेव्हा बोलावेल त्यावेळी न्यायालयात उपस्थित राहावे, यासारख्या अटी न्यायालयाने घातलेल्या आहेत. दरम्‍यान, सरकारी नोकरीच्‍या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्‍या आणखीही वाढू शकते. काही जणांनी भीतीपोटी पैसे अदा करून प्रकरणे मिटविण्‍याचे प्रयत्‍न सुरू केल्‍याचेही कळते. पोलिसांकडून सखोल तपास करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshat Kaushal Goa : एक्सपोझिशनसाठी 1,000 तर इफ्फीसाठी 300 पोलिस तैनात; ड्रोन आणि वॉच टॉवरद्वारे निगराणी

Delhi Goa Flight: दिल्ली - गोवा विमानात महिलेचा लैंगिक छळ; हरियाणातील तरुणाला अटक

Film Festival: देशाच्या 'स्वर्गात'ही यंदा फिल्म फेस्टिव्हल! इफ्फी आयोजनाच्या अभ्यासासाठी J&K अधिकाऱ्यांचा गोवा दौरा

Goa Sunburn: सनबर्न धारगळमध्ये नकोच!! स्थानिकांचा कडाडून विरोध; हायकोर्टात होणार फैसला

IFFI Goa 2024: सिनेरसिकांची निराशा! एक दिवसाची जीवाची इफ्फी आता बंद; संपूर्ण कालावधीसाठी करावी लागणार नोंदणी

SCROLL FOR NEXT