Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cash For Job Scam Goa: अटक अनिकेत कांदोळकर याचे कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात अटेकत असलेल्या दिपश्री सावंत हिच्याशी जवळचे संबंध होते
Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Aniket KandolkarDainik Gomantak
Published on
Updated on

Cash For Job Scam Goa

फोंडा: नोकरी घोटाळा प्रकरणात क्रीडा, कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयातील माजी कर्मचारी अनिकेत कांदोळकर याला अटक करण्यात आली. म्हार्दोळ पोलिसांनी आज (१९ नोव्हेंबर) ही कारवाई केली. अनिकेतला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कॅश फॉर जॉब घोटाळ्याचे जाळे दिवसेंदिवस पसरत चालल्याचे दिसत आहे. याप्रकरणी सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. त्यानंतर यात काही मंत्री आणि राजकीय नेत्यांची नावे देखील समोर आली.

याबाबत तशा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप देखील उघडकीस आल्या. विविध राजकीय कनेक्शन समोर येत असताना यात मंत्री गोविंद गावडेंच्या माजी कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

अनिकेत कांदोळकर हा मंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यलयात कार्यरत होता. त्याचे कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात अटेकत असलेल्या दिपश्री सावंत हिच्याशी जवळचे संबंध होते अशी माहिती आहे. मंत्री गावडे यांनी त्याला काही दिवसांपूर्वी कामावरुन कमी केल्याचे देखील सांगितले जाते.

यापूर्वी गणेश गावकर यांच्यासह इतर नेत्यांची नावे या प्रकरणात समोर आली असताना मंत्री गावडे यांच्याशी संबंधित एक व्यक्ती आता अटकेत आहे. गावडे यांनी या प्रकरणावर अद्याप भाष्य केले नसले तरी नोकरी घोटाळ्यात आणखी काय नवे खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Job Scam
Colvale Police Arrest 29 Year Old
 Goa Facebook Part Time Job Scam
WhatsApp Part Time Job Scam Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com