Court Dainik Gomantak
गोवा

Souza Lobo Restaurant Case: गजेंद्र सिंग याचा जामीन नाकारला

कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोडप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

दैनिक गोमन्तक

पणजी: कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोडप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. यातील मुख्य सूत्रधार असलेला संशयित गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू याला आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला. त्यामुळे जामिनावर सुटका होण्याची त्याची सर्व दारे बंद झाली आहेत. या प्रकरणातील काही संशयित अजूनही फरार आहेत. (Court rejects Gajendra Singh's bail in restaurant vandalism case in Calangute Goa )

संशयित गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू याने या प्रकरणात अटक होण्यापूर्वी कळंगुट भागात काही दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दबदबा निर्माण केला होता. त्याच्या वर्चस्वामुळे कळंगुट परिसरातील अनेक व्यावसायिक त्याला घाबरत होते. त्याने काही बाऊन्सरही ठेवून दहशत निर्माण केली होती.

या प्रकरणात अटक केल्यानंतर त्याने न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर प्रथमश्रेणी, सत्र तसेच उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेले अर्ज फेटाळले होते. त्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी विशेष याचिका सादर केली होती.

सिली सोल्स'वर जाहीर चर्चा करा

आसगाव येथील कथित ‘सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार’ प्रकरणावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सार्वजनिकरित्या चर्चा करण्यासाठी पुढे यावे, असे रोखठोक आव्हान सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी केले आहे. अशी जाहीर चर्चा केल्याशिवाय गोव्यातल्या आणि देशभरातील लोकांना सत्य कळणार नाही, असेही रॉड्रिग्स यांचे मत आहे.

याबाबत रॉड्रिग्स म्हणाले, ‘सिली सोल्स’ची जागा आणि परवाने स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असल्याचा दावा कोणीही केलेला नाही. मात्र, हे हॉटेल ज्या कंपनीकडून चालवले जाते, त्या एइटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजिस कंपनीचे संचालक इराणी यांचे पती आणि मुलगा हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत.

या कंपनीचा पत्ता सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार या पत्त्यावरच आहे. याशिवाय याच कंपनीचा जीएसटीसाठीचा पत्ताही तोच आहे, यावरून प्रथमदर्शनी हे हॉटेल इराणी यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून चालवले जाते, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अंत्यविधीच्या ठिकाणी 'ऑर्केस्ट्रा'! एका बाजूला चिता जळतेय, दुसऱ्या बाजूला गाण्यांवर डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Ind A vs SA A: सलामीवीर ढेपाळले, मधल्या फळीनेही हात टेकले, आफ्रिकेने टीम इंडियाला 73 धावांनी चारली पराभवाची धूळ; क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले! VIDEO

Konkan Railway: कोकण रेल्वेतील मोठी कारवाई! नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त; 'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT