Court Dainik Gomantak
गोवा

Anjuna: हल्ल्याच्या तपासाची केस डायरी सादर करा; न्यायालयाचे हणजूण पोलिसांना निर्देश

या वर्शनेई बंधूंनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जावरील पुढील सुनावणी येत्या 7 डिसेंबरला ठेवली आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: वागातोर येथील रिथ या नाईट क्लबच्या कर्मचाऱ्यांकडून अनिश व आदित्य वर्शनेई या दोघा बंधूंना झालेल्या मारहाणप्रकरणी केलेल्या तपासकामाची माहिती (केस डायरी) सादर करण्याचा आदेश म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाच्या न्यायाधीश आश्‍विनी खांडोळकर यांनी दिला आहे. या वर्शनेई बंधूंनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जावरील पुढील सुनावणी येत्या 7 डिसेंबरला ठेवली आहे.

(Goa Night Club)

या दोन्ही बंधूतर्फे न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर ॲड. आयरिश रॉड्रिग्ज हे बाजू मांडत आहेत. दोन आठवडे उलटून गेली तरी हणजूण पोलिसांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही व तपासकामात चालढकलपणा चालविल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले. पोलिस संशयितांना अटक करण्याऐवजी अभय देत आहेत.

या नाईट क्लबच्या ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली त्यांची नावे तक्रारीत नमूद करण्याऐवजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यासही उशीर लावला. या मारहाणीत दोघा बंधूपैकी एकाच्या डोळ्याला जबर मारहाण झाली आहे व त्यामुळे त्याला डोळा गमावण्याची पाळी आली असती, असा युक्तिवाद ॲड. रॉड्रिग्ज यांनी केला.

या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे व सर्व बाजूने त्याची चौकशी सुरू आहे. संशयितांचा शोध घेण्यात येत आहे मात्र अजूनही सापडलेले नाहीत. त्यातील एक संशयित विनय तुपकर याला नोटीस बजावण्यात आली आहे मात्र अजूनही तो उपस्थित राहिलेला नाही. या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे व त्यांच्या मार्गदर्शनानुसारच पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी फ्रांसिस्को झेव्हियर यांनी न्यायालयाला उत्तरादाखल दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT