Cortalim ZP Dainik Gomantak
गोवा

Cortalim ZP: मार्सियाना वास यांच्या नावावर शिक्कामोर्तब

कुठ्ठाळी मतदार संघ नागरिक समितीने केले शिक्कामोर्तब

दैनिक गोमन्तक

वास्को: कुठ्ठाळी मतदार संघ नागरिक समितीने 10 ऑक्टोबर 2022 रोजी कुठ्ठाळी मतदारसंघाच्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी श्रीमती मार्सियाना वास यांच्या उमेदवारीवर एकमताने शिक्कामोर्तब केले.

(Cortalim citizens support Marciana Vas for zilla panchayat by-election)

कुठ्ठाळी येथे मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. या सभेत सर्वानुमते श्रीमती मार्सियाना वास यांनी आगामी निवडणुक लढवण्याचा कुठ्ठाळी मतदारसंघ नागरिक समितीच्या निर्णयाचा स्विकार करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य श्री वास यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका होत आहे. आंतोनियो वास हे कुठ्ठाळी मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले.

सध्या श्रीमती मार्सियाना वास या गुठ्ठाळीच्या पंच सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच उपसरपंच म्हणूनही त्या आरुढ झाल्या आहेत. कोविड काळात त्यांचे पती आंतोनियो वास यांना मदत करण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावली. मतदार संघातील प्रलंबित विकास कामे पुढे नेण्यासाठी पती-पत्नीची जोडी कृतीत आहे. असा दावा कुठाळी मतदारसंघ नागरिक समितीने केला.

सदस्यांनी यावेळी श्रीमती वास यांच्या विजयाचे वास यांच्या विजयासाठी कोणतीही कसर न सोडण्याची शपथ घेतली. आंतोनियो वास यांनी 2020 मध्ये त्यांची झेडपी निवडणूक 4567 मतांनी जिंकली होती. जी गोव्यातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक फरकाने होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT