Corona Third Wave in Goa

 

Dainik Gomantak 

गोवा

Goa Corona Wave: गोव्यात कोरोनाची तिसरी लाट

नवे 592 कोरोनाबाधित, 6 जणांना ओमिक्रॉनची लागण

दैनिक गोमन्तक

पणजी :  देशभर ओमिक्रॉन या कोरोना व्हेरियन्टचा संसर्ग आणि प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. गोवा राज्यातही हीच स्थिती आहे. मात्र हा प्रसार ओमिक्रॉनचा की जुन्या डेल्टा व्हेरिएन्ट हे सांगण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेशी यंत्रणाच नाही. तर  राज्यात 28 डिसेंबरपासून रुग्णवाढीचे प्रमाण दुपटीने वाढत आहे. ही कोरोनाची तिसरी लाट ( Corona Third Wave) सुरू झाल्याची कबुली आरोग्य विभागाचे संचालक डॉ.आयरा आल्मेदा यांनी दिली. तसेच राजकीय सभांना नागरिकांनी जाऊ नये असे जाहीर आवाहनही त्यांनी केले. (Goa Latest Corona News updates)

आरोग्य विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.आयरा आल्मेदा यांच्यासह लसीकरण विभागाचे समन्वयक डॉ. राजेंद्र बोरकर कोरोना विभागाचे संयोजक डॉ. उत्कर्ष बेतोडकर उपस्थित होते. राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. हजारो लोक या सभांना हजर असतात. यातून कोरोनाचा प्रसार (Corona Third Wave) होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर या राजकीय सभांना नागरिकांनी जाऊ नये असे जाहीर आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने कोरोना संबंधीच्या आदर्श कार्यप्रणालीचे (एसओपी) पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी वैयक्तिक काळजी घेतल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणणे शक्य आहे, असा विश्‍वास आरोग्य खात्याने व्यक्त केला.

गेल्या 24 तासात संशयितांच्या केलेल्या चाचण्यांमध्ये (Corona Test) 592 रुग्ण कोरोनाबाधित सापडले असून संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) 13.89 आहे. मंगळवारी 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा (Death) आकडा 3525 झाला आहे. सध्या राज्यात 2763 इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील 95 टक्के नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतली असून 15 ते 18 वयोगटातील 20 टक्के तरुणांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. हा आकडा सुमारे 15 हजार असल्याची माहिती लसीकरण विभागाचे संयोजक डॉ.राजेंद्र बोरकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

डिचोली, कारापूर, मये, साळमध्ये 'कोकम' व्यवसायाची लगबग; यंदाही आमसुले होणार 'आंबट', 40% पीक वाया; पावसावर दरवाढ अवलंबून

SCROLL FOR NEXT