corona possitive 
गोवा

कोरोनाची शतकी हॅट्‍ट्रिक

Vilas Ohal

विलास ओहाळ

पणजी : राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणूचा संक्रमण होण्याऱ्यांची संख्या शंभरवर आढळून आली आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ हजार २५१ वर पोहोचली आहे. त्याशिवाय ७४ जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेला माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार, माहिती खात्याच्या संचालक मेघना शेटगावकर यांची उपस्थिती होती.

सुरवातीलाच पोंबुर्फा येथे मुलाने केलेल्या आत्महत्येवर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर मोहनन म्हणाल्या की, त्या मुलाच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे, हे माहीत नाही. परंतु शिक्षण संचालनालयाने सकाळीच आपणास त्याविषयी माहिती दिली. त्यात त्या मुलाला स्मार्टफोन मिळाला होता. त्याने आत्महत्या केली ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.


एकाकडून प्‍लाझ्‍मा दान
फातोर्डा आमदारांनी कोरोना रुग्णालयातील औषधांविषयी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाविषयी मोहनन यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, सर्व कोविडचे रुग्ण हे एकसारखेच आहेत. त्याचबरोबर त्या रुग्णांना उच्च दर्जाचे औषध देण्याकडे डॉक्टरांचा कल असतो. मुख्यसचिव हे सतत हैदराबाद येथील औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून असून, आम्ही अगोदरच मोठ्या प्रमाणात औषधांची मुख्य वितरकांकडे मागणी केलेली आहे. गोमेकॉमध्ये प्लाझ्मा थेरपी सुरू झालेली आहे. प्लाझ्मा बँकही सुरू झाली असून आज एका दात्याने प्लाझ्मा दान केला आहे, असे सचिवांनी सांगितले.

कंपन्‍यांनी मार्गदर्शक तत्‍वे पालन करावी
वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याविषयी मोहनन म्हणाल्या की, वसाहतीत अनेक औषधांच्या कंपनी आहेत. तेथे वाढत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा भाग बंद करण्याचे आदेश काढलेले आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई दररोज औषध कंपन्यांशी बैठका घेत आहे. जी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, ती सर्व पाळण्याच्या त्यांनी कंपन्यांना सूचना केल्या आहेत.

लोकांनी सतर्क राहावे
ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे, त्याठिकाणी आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून, अशा भागातील लोकांनी स्वतःची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय अस्वस्थ वाटले, तरीही १०४ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेला बोलविणे गरजेचे आहे. ईएसआय हॉस्पिटलमध्ये ११२ रुग्ण आहेत. शिक्षण खात्यात कोरोना संक्रमित सापडल्यामुळे आरोग्य खात्याने काय पावले उचलली आहेत, याविषयी मोहनन यांनी सांगितले की, आज १९ ते २० जणांची स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. कार्यालय पूर्णपणे बंद करण्यात आले असून, कार्यालय व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.

मागील तीन दिवसांतील संक्रमण
बुधवारी १३६
गुरुवारी ११२
शुक्रवारी १००

एकूण संक्रमित रुग्ण संख्या २,२५१
प्रकृतीत सुधारणा झालेले १,३४७
आत्तापर्यंत आलेले तपासणी अहवाल ८५,१८०
तपासणीसाठी पाठविलेले सॅम्पल्स ८७,८६५
आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण ८७०
होम कॉरन्टाईन असलेले १५,३६१
बाहेरून आलेले आणि कॉरन्टाईन केलेले ११,३९६
परदेशी पण होम कॉरन्टाईन झालेले ६,०१७
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: अर्शदीप सिंहनं टाकलं 13 चेंडूंचं षटक! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावावर केला लाजिरवाणा रेकॉर्ड

Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

Goya Club Seal: परवानग्यांमध्ये घोळ, सुरक्षा नियमांची ऐशीतैशी, वागातोरमधील प्रसिद्ध 'गोया' क्लब सील; गोव्यातील नाईटलाइफला कडक संदेश

Crime News: एकाला फाशी, 9 जणांना जन्मठेप... हिंसाचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना कोर्टाचा दणका; काय आहे नेमकं प्रकरण?

VIDEO: भारतीय सागरी सीमेत घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळला, बोट जप्तीसह 11 खलाशी जेरबंद; तटरक्षक दलाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT