Dr. Shekhar Salkar on Third Wave Dainik Gomantak
गोवा

'...तर गोव्यात लॉकडाऊनसारखी स्थिती येईल'

गोव्यात 20 जानेवारीच्या आसपास कोरोना संक्रमणाचा उच्चांक, डॉ. शेखर साळकरांचा अंदाज

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील संक्रमणाचा उच्चांक गाठला जाईल, अशी शक्यता डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केली आहे. दर दिवसाला सुमारे 10 ते 15 हजार कोरोना रुग्ण सापडतील, असा अंदाजही साळकर यांनी व्यक्त केला आहे. (Third Wave in goa News Update)

डॉ. शेखर साळकर हे तज्ज्ञ समितीसह टास्क फोर्सचेही सदस्य आहेत. गोव्यात (Goa) दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाटही आरोग्य विभागाने याआधीच जाहीर केली आहे. त्यामुळे आता पुढील 8 दिवसात कोरोना रुग्णवाढ उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या आऱोग्यव्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गोवा मेडिकल कॉलेजमधील जवळपास 100 हून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे त्याचा ताण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे

दरम्यान जर गोमेकॉमधील (Goa Medical College) 10 ते 40 टक्के बेड्स रुग्णांनी भरले, तर राज्यात आणखी निर्बंध लावण्याची वेळ येईल. जर हा आकडा 50 टक्क्यांवर गेला तर उत्तर आणि दक्षिण गोव्यातील (South Goa) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल खुली करावी लागतील. ज्यानंतर राज्यात संचारबंदी किंवा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असंही डॉ. शेखर साळकर यांनी सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT