गोव्यात भरारी, तपासणी पथके तैनात

निवडणूक यंत्रणा सक्रिय झाल्याने पैसे, वस्तूंच्या देवघेवीवर करडी नजर
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील निवडणूक यंत्रणा अधिक सक्रिय झाली असून तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघात तपासणी, भरारी तसेच दक्षता पथके तैनात करण्यात आली. निवडणूक प्रचारावेळी पैशांची तसेच वस्तूंचे वितरण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. निवडणूक कार्यालयामध्येही तालुका निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक सामग्री नेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. (Goa Election News Updates)

Goa Assembly Election 2022
Goa Election 2022: मगोप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार?

गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यातील निवडणूक (Goa Assembly Election) जाहीर केल्यानंतर राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी पोलिस व अबकारी तसेच बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आयोगाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिल्यानंतर दोन्ही जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) कामाला लागले आहेत. आज पणजीतील सांता मोनिका जेटी या ठिकाणी असलेल्या पार्किंग प्लाझा इमारतीसमोर ‘स्टॅटिक सर्व्हेलन्स पथक’ सुरू केले आहे.

Goa Assembly Election 2022
'कॉंग्रेसने अकार्यक्षम मानलेले मायकल लोबो आता कार्यक्षम कसे झाले?'

पणजी (Panaji) शहरात प्रवेश करणारी माल वाहतूक वाहने तसेच इतर राज्यांतील वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान आयोगाने येत्या 15 जानेवारीपर्यंत प्रचार सभा व मिरवणुकीला बंदी घातल्याने उमेदवारांनी घरोघरी प्रचाराला (Election Campaign) सुरुवात केली आहे.

Goa Assembly Election 2022
गोवा विधानसभा सचिव नम्रता उलमन यांनी आतापर्यंत स्वीकारले 'इतके' राजीनामे

सराईत गुन्हेगारांना समन्स

प्रत्येक तालुक्यात पोलिस उपअधीक्षकांनीही निरीक्षकांसमवेत मतदान केंद्रांची पाहणी केली. प्रत्येक मतदारसंघातील गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेल्या गुन्हेगारांना पोलिस स्थानकामार्फत समन्स पाठवले आहेत. निवडणूक काळात शांतताभंग न करण्यासंदर्भात त्यांना ताकीद दिली जाणार आहे. निवडणूक काळात परवानाधारक पिस्तुले तसेच बंदुका ठेवण्यास बंदी असल्याने त्या पोलिस स्थानकात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे कोणी जमा करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Goa Assembly Election 2022
'त्या' भाजपच्या फोंड्यातील बैठकीत कार्यकर्ते एकमेकांत भिडले

20 जानेवारीपासून अर्ज भरणी

20 जानेवारीपासून तालुकावार उपजिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांकडून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली सामग्री प्रत्येक उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रचारादरम्यान मतदारांना पैशांची तसेच वस्तूंची आमिषे दाखविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com