शपथविधी सोहळा Dainik Gomantak
गोवा

शपथविधी: गोवा सरकारला निर्बंधांचा विसर; माध्यम प्रतिनिधींना खुराड्यात कोंडले

कोरोना महामारीचे भयावह वास्तव अजून संपुष्टात आलेले नसतानाही गोवा सरकारला (Goa) प्रत्येक गोष्टीत इव्हेन्ट का करावा वाटतो?

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत अद्याप कमी झालेला नसतानाही दोनापावल येथील काबो राजभवनवर भव्य दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचा शपथविधी झाला. कोरोना महामारीचे (Corona rules break) भयावह वास्तव अजून संपुष्टात आलेले नसतानाही सरकारला प्रत्येक गोष्टीत इव्हेन्ट का करावा वाटतो? (Corona rules break During swearing-in ceremony of governor in Goa)

यापूर्वीही कोरोना नसताना अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री यांचे शपथविधी सोहळे राजभवनातील दरबार हॉलमध्ये झाले होते. शिवाय अनेकांनी पद आणि गोपनीयतेची शपथ ऑनलाईन आणि व्हिडिओ कॉलिंगच्या साहाय्याने घेतली असताना अशा भव्य-दिव्य शपथविधी सोहळ्याची गरजच काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

काल गुरुवारी या शपथविधी सोहळ्याला शेकडो पाहुण्यांना आमंत्रित केले होते. विशेष करून केरळमधील विविध चर्चचे बिशप, फादर, धर्मगुरू आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. याशिवाय राज्यातील राजकीय पक्षांचे नेते, विविध खात्यांचे सचिव, अधिकारी उपस्थित होते. एरवी सामान्य नागरिकांना लग्न सोहळ्यासाठी 50 आणि इतर कार्यक्रमांसाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची अट असताना, शिवाय राज्यात संचारबंदी कायम असताना असे भव्य-दिव्य सोहळे आयोजित केल्याबद्दल प्रश्‍न केला जात आहे. हा सोहळा शाही स्वरूपात होण्याऐवजी मर्यादित स्वरूपात व्हावा, अशी अपेक्षा यापूर्वीच ‘दैनिक गोमन्तक’ने व्यक्त केली होती. तरीही शाही थाटात हा सोहळा झाला. कार्यक्रमस्थळी कोविडविषयक नियमांची पायमल्ली झालेली दिसत होती.

वॉटरप्रूफ शामियान्यातही पावसाचे पाणी

या शपथविधी सोहळ्यासाठी 200 हून अधिक लोक उपस्थित राहू शकतील, असा भव्य शामियाना राजभवनच्या प्रांगणात उभारला होता. सध्या राज्यात पाऊस पडत असल्याने हा मंडप वॉटरप्रूफ करण्यासाठी त्यावर पत्रेही घातले होते. मात्र, मुख्य सोहळ्यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. कार्पेटही भिजले. शपथविधी सोहळ्यानंतर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्याची प्रथा आहे. या मानवंदनेसाठीही खास मंडप उभारला होता.

वेगवेगळ्या पंथांच्या बिशपांची उपस्थिती

श्रीधरन पिल्लई हे मूळ केरळचे आहेत. ते हिंदू असले तरी ख्रिश्चन धर्मियांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचे धर्मगुरूंशी जवळचे संबंध आहेत. पहिल्यांदाच दोन विरोधी विचारधारा असणाऱ्या पंथांचे बिशप यावेळी एकत्र आले होते. यावेळी किट्टयामच्या कोबाईट सिरेन चर्चचे बिशप थॉमस तिमोथीओस, तसेच बिशप जी वर्गीस जुलियस उपस्थित होते. याबरोबरच केरळमधील अनेक चर्चचे फादरही या सोहळ्याला उपस्थित होते.

माध्यम प्रतिनिधींना खुराड्यात कोंडले

या सोहळ्याचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार-छायाचित्रकारांना आमंत्रित केले होते. पण त्यांंना अत्यंत कमी जागेत कोंबड्यांच्या खुराड्याप्रमाणेे दाटीवाटीने कोंबले होते. पत्रकारांनी बाहेर जाऊ नये, यासाठी तेथे पोलिसही नेमले होते. कोविड एसओपी लागू असताना ठिकाणी पत्रकारांना गर्दीत ठेवणे अत्यंत धोकादायक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT