Money Scam| Dainik Gomantak
गोवा

Bank Scam In Mapusa: सहकारी पतसंस्थेत घोटाळा; जमा रकमेबाबत ग्रामस्थांना शंका

सोसायटीमधील या शाखेच्या व्यवहाराची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी सरकारने केली आहे.

दैनिक गोमन्तक

Money Scam: खोर्जुवे गावातील एका सहकारी पतसंस्थेत जमा केलेल्या रक्कमेसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत सदर सोसायटीमधील या शाखेच्या व्यवहाराची सरकारने चौकशी करावी.

त्याचप्रमाणे या सोसायटीत जमा केलेल्या पीडित स्थानिकांच्या सर्व ठेवींचा परतावा मिळावा, अशी मागणी संबंधितांनी केली. यासंदर्भात ग्रामस्थांनी खोर्जुवे गावात आयोजित बैठकीनंतर वरील मागणी केली.

‘अष्टगंध अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी’ मर्यादित या सहकार क्षेत्रातील शाखेमधील व्यवहाराची कायदेशीर चौकशीची मागणी पीडित रहिवाशांनी केली आहे. खोर्जुवे गावात ही शाखा मे 2022 मध्ये बंद करण्यात आली. जिथे शाखा उघडली होती, तेथील जागेचे भाडेही जमा करण्यात आलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

ग्रामस्थ तथा या सहकारी सोसायटीचे खातेधारक देविदास पणजीकर यांनी सांगितले की, 2016मध्ये खोर्जुवे गावात शाखा सुरू झाली होती. गावात बँक आल्याने अनेकांनी आपले खाते उघडले होते.

वीज व पाण्याची बिले जमा करण्यास लोकांना सोसायटी सोयीस्कर बनली. मात्र, 2022नंतर येथे जमा केलेल्या बिलांचा या सोसायटीच्या शाखेकडून संबंधित खात्याकडे भरणा केला जात नव्हता.

त्यामुळे जोडणी तोडली जाणार या भीतीने अनेकांनी पुन्हा या बिलांची रक्कम जमा केली होती, याप्रश्‍नी ग्रामस्थांनी खोर्जुवे नागरिक कृती समिती स्थापन केली असून सोसायटीच्या व्यवहारासंदर्भात सहकार निबंधकांकडे तक्रार केली जाणार असल्याचे पणजीकर यांनी सांगितले. तसेच या तक्रारीच्या प्रति मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्र्यांना दिल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Goa:"सनबर्न नाही तर दुसरं कोणीतरी येईल" पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Assembly: गोमंतकीयांना मिळणार स्वस्त दरात मासळी, सरकार धोरणात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री

Sadetod Nayak: मराठी राजभाषेसाठी माझा पूर्ण पाठिंबा - जीत आरोलकर

Goa Assembly Live: १७ (२) अंतर्गत जमीन रुपांतर नाही!

Goa Assembly Session: पंधरा वर्षे पूर्ण झालेल्‍या 28,110 वाहनांचे नूतनीकरण! वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

SCROLL FOR NEXT