Amit Shah anti drug meeting Dainik Gomantak
गोवा

अमलीपदार्थविरोधी कारवाईसाठी समन्वय महत्त्वाचा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध खात्यांच्या सचिवांची घेतली बैठक

Amit Shah anti drug meeting: गोव्यात अमलीपदार्थविरोधी कठोर कारवाई करण्यासाठी विविध खात्यांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात अमलीपदार्थविरोधी कठोर कारवाई करण्यासाठी विविध खात्यांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. या संस्थांमधील परस्पर समन्वय दृढ झाला तरच ते शक्य आहे. त्यामुळे गृहखात्याशी संबंधित सर्व खात्यांनी समन्वय ठेवावा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या विविध खात्यांच्या सचिवांबरोबरच्या बैठकीत दिला.

गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमानुसार दोना पावला येथील तारांकित हॉटेलमध्ये राज्यातील गृहखात्याशी संबंधित इतर सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस मुख्य सचिव व्ही. कंदवेलू, पोलिस महासंचालक अलोक कुमार यांच्यासह पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी, विविध खात्यातील सचिव व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, सुरक्षित आणि अमलीपदार्थमुक्त समाज घडवण्याबाबत गोव्याची ठाम कटिबद्धता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

‘नशामुक्त भारत’वर अधिक भर

या बैठकीविषयी मुख्यमंत्री सावंत यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले की, विविध संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री शहा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यांनी गोव्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय मुद्यांचा आढावा घेतला.

यामध्ये विविध संस्थांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ करणे, प्रलंबित बाबींचे वेळेत निराकरण करणे आणि अमलीपदार्थविरुद्ध कठोर कारवाई करून ‘नशामुक्त भारत’चे उद्दिष्ट साध्य करणे या गोष्टींवर विशेष भर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT