The Kashmir Files movie news | Margao News Updates  Dainik Gomantak
गोवा

मडगाव येथे ‘द काश्मीर फाईल्स’ वरून गोंधळ

आयनॉक्स कर्मचाऱ्यांना मारहाण; अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद

दैनिक गोमन्तक

मडगाव: वादग्रस्त ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाचे पोस्टर लावले नसल्याचे कारण पुढे करून मडगाव येथील आयनॉक्स थिएटरच्या कर्मचाऱ्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याची घटना घडली असून यासंबंधी 45 जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.याच दरम्यान, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखू नका अशी सूचना खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयनॉक्स व्यवस्थापनाला केल्याने या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. (Margao News Updates)

यासंबंधी आयनॉक्सचे व्यवस्थापक जोजफ परेरा यांनी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर 45 अज्ञात व्यक्तींविरुद्ध बेकायदा जमाव जमवून थिएटर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद केला.

‘पंडितांवरील अत्याचार कळलेच पाहिजेत’

आता या वादात खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हेही पडले असून काश्मीरमधील हिंदू पंडितांवर झालेल्या अत्याचारांची माहिती सर्व लोकांना कळलीच पाहिजे त्यासाठी हा सिनेमा चालू ठेवण्याची विनंती आपण आयनॉक्स व्यवस्थापणाला केल्याचे ट्विट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. जेणेकरून भविष्यात असे हल्ले होणार नाहीत अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

कर्मचाऱ्यांना मारहाण

मडगावच्या आयमनॉक्स थिएटरमध्ये शो सुरू असताना बजरंग दलाचे जयेश नाईक व इतरांनी थिएटरमध्ये जाऊन गोंधळ घातला. या चित्रपटाचे पोस्टर बाहेर का लावले नाही यावरून वाद उरकून काढून आयनॉक्सच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT