Navelim Stadium  Goa JD
गोवा

Manohar Parrikar Stadium: स्टेडियम खेळण्यासाठी की लग्नासाठी...? नावेलीतील स्टेडियमचा वाद चिघळणार

Navelim Manohar Parrikar Indoor Stadium: स्टेडियम खेळण्यासाठी की लग्न-प्रदर्शने भरविण्यासाठी असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोवा क्रीडा प्राधिकरणाने नावेली येथील स्व. मनोहर पर्रीकर स्टेडियमचा वापर विवाह सोहळ्यासाठी आणि प्रदर्शनासाठी करण्याची परवानगी देण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयाबाबत सध्‍या वाद निर्माण झाला आहे. खेळाडूंबरोबरच अनेक स्‍तरातून टीका होऊ लागली आहे. या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून हा प्रश्‍न चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्टेडियम खेळण्यासाठी की लग्न-प्रदर्शने भरविण्यासाठी असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सरकारने हा निर्णय त्‍वरित बदलावा, अशी मागणी होत आहे.

सासष्‍टीतील नागरिक आणि क्रीडाप्रेमींना खेळण्‍यासाठी चांगल्‍या सुविधा मिळाव्‍यात यासाठी नावेली येथील स्‍व. मनोहर पर्रीकर स्‍टेडियमचा वापर व्‍हावा.ते आणखी सुविधायुक्‍त करावे ,अशी मागणी आपच्‍या युवा शाखेचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष सिद्धेश भगत यांनी केली आहे. स्‍टेडियमचा वापर खेळण्‍यासाठीच व्‍हावा लग्‍न समारंभ आयोजित करण्‍यासाठी किंवा प्रदर्शने भरविण्‍यासाठी त्‍याचा उपयोग नको, असेही ते म्हणाले. प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाचा भगत यांनी तीव्र निषेध केला.

सासष्टीत अजूनही सर्व सोयींनी सुसज्‍ज असलेले इनडोअर स्‍टेडियम उपलब्‍ध नाही, त्‍यामुळे नावेलीच्‍या इनडोअर स्‍टेडियमचा त्‍यादृष्‍टीने विकास करावा आणि युवा पिढीला चांगल्‍या वातावरणात खेळण्‍याची संधी प्राप्‍त करून द्यावी, अशी मागणी भगत यांनी केली आहे.

विवाह सोहळ्यांसारख्या कार्यक्रमांसाठी स्टेडियमची डागडुजी करण्याऐवजी, आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी क्रीडा सुविधा सुधारण्यास प्राधान्य द्यावे. यामध्ये योग्य वातानुकूलीत यंत्रणा आणि पंखे बसवणे समाविष्ट आहे. अनेक आमदारांनी विधानसभेच्या अधिवेशनात क्रीडा संकुलातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्‍या होत्‍या. सुसज्ज स्टेडियमचा फायदा केवळ खेळाडूंनाच होणार नाही तर अधिक तरुणांना खेळात सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल, असे भगत म्हणाले.

स्पोर्टस् मस्ट गो ऑन..!

मडगावातील युवा नेते प्रभव नायक यांनी या निर्णयावर टीका करताना, स्पोर्टस् मस्ट गो ऑन! असे म्‍हटले आहे. खेळाडूंसाठी नावेली येथील इनडोअर स्टेडिअम बंद करणे आणि लग्नाच्या कार्यक्रमासाठी भाड्याने देणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. मी क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांना आवाहन करतो की, खेळाडूंना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सराव आणि खेळण्यासाठी स्टेडियम उपलब्ध व्हावा, अशी मागणी नायक यांनी केली.

लोकांनी रस्‍त्‍यावर उतरून निषेध करावा

मडगावातील आणखी एक युवा नेते चिराग नायक यांनीही या निर्णयावर टीका करताना, आपण स्‍वत: एक खेळाडू आणि क्रीडाप्रेमी असून खेळण्‍यासाठी असलेल्‍या जागा विवाह सोहळ्‍यासाठी देणे अयोग्‍य आहे. सरकार हा निर्णय पुढे रेटू पाहत असल्‍यास सासष्‍टीतील लोकांनी स्‍वत:हून रस्‍त्‍यावर उतरून निषेध करावा, असे ते म्हणाले. सरकारने हा निर्णय मागे घ्‍यावा यासाठी आपण स्‍वत: क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्‍याशी संपर्क साधणार, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

नावेली येथील स्‍व. मनोहर पर्रीकर स्‍टेडियमवर क्रीडाबाह्य कार्यक्रमाच्‍या आयोजन करण्‍याची परवानगी देण्‍याच्‍या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन सरकारला करतो. क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. खेळांना प्रोत्साहन देऊन तरुणांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
सिद्धेश भगत, आपच्‍या युवा शाखेचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT