Navelim News: वैयक्तिक कारणावरून नावेली ग्रामसभेत राडा; खुर्च्या फेकण्याचा प्रकार

Romi Konkani: कोकणी रोमी लिपीला मान्यता देण्याचा ठराव मंजूर
Romi Konkani: कोकणी रोमी लिपीला मान्यता देण्याचा ठराव मंजूर
Navelim FightDainik Gomantak

नावेली ग्रामसभा आज गाजली ती दोन कारणांसाठी. वैयक्तिक कारणावरून दोन व्यक्तींमध्ये हाणामारी झाली हे एक कारण. दोघांनीही एकमेकांवर बुक्के व खुर्च्या फेकण्याचा प्रकार घडला.

कोकणी रोमी लिपीला मान्यता द्यावी हा ठराव मंजूर करणारी नावेली पंचायत गोव्यातील पहिली पंचायत ठरली आहे, हे दुसरे कारण. नावेली ग्रामसभा सुरळीत चालू असताना एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून काही अपशब्द उच्चारले त्यावरून हा राडा झाला.

दरम्यान, नावेलीच्या ग्लोबल कोकणी फोरमने नावेली पंचायतीला एक निवेदन सादर करून कोकणी रोमी लिपीला मान्यता द्यावी असे नवी दिल्लीतील भारताच्या भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या कमिशनरला पंचायतीने पत्र लिहून विनंती करावी असे त्यात म्हटले आहे.

हे निवेदन आज ग्रामसभेत चर्चेला आले व त्यास मंजुरी देण्यात आली. कोकणी रोमी लिपीला मान्यता देण्यासाठी लढण्यासाठी हा फोरम हल्लीच सुरू करण्यात आला आहे.

Romi Konkani: कोकणी रोमी लिपीला मान्यता देण्याचा ठराव मंजूर
Navelim News : नावेलीत जलवाहिनी फुटल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल

‘ग्लोबल कोकणी फोरम’चा पुढाकार

राजभाषा अधिनियम कायद्यामध्ये दुरुस्ती करून देवनागरीबरोबर कोकणी रोमी लिपीलाही अधिकृत दर्जा द्यावा, अशी ‘ग्लोबल कोकणी फोरम’ची मागणी आहे. गत ३६ वर्षांपासून कोकणी रोमी लिपीवर अन्याय व भेदभाव होत आहे. या दरम्यान मागील सर्व सरकारने अनेक आश्र्वासने दिली, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही, असे फोरमचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com