Calangute Chh. Shivaji Statue  Dainik Gomantak
गोवा

Calangute Chh. Shivaji Statue: कळंगुटमधील छत्रपती शिवपुतळ्यावरून वाद सुरूच

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute Chh. Shivaji Statue Controversy: कळंगुटमधील छत्रपती शिवपुतळ्यावरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नसून, यासंदर्भात आता शिवप्रेमी व काही हिंदू संघटनांनी सरपंच जोसेफ सिक्वेरा व संबंधित पंचसदस्य ज्यांनी पुतळा हटविण्यासंबंधी ठराव घेतला होता, त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

जोसेफ सिक्वेरा यांच्यासह अ‍ॅनी फर्नांडिस, सावियो गोन्साल्विस यांनी हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावण्यासह शिवप्रेमींना चिथावल्याप्रकरणी या संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या शिवप्रेमींनी केली आहे.

करणी सेनेचे सरचिटणीस संतोषसिंग राजपूज व गोंयची नारी शक्ती या एनजीओच्या संस्थापक सदस्या निशा वेर्णेकर यांनी कळंगुट पोलिस स्थानकात स्वतंत्र तक्रार देत सरपंचांसह ठराव घेतलेल्या पंचसदस्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पंचायत इमारत हायजॅक केली व पंचायतीत कामाला येणाऱ्यांना सेवेपासून वंचित ठेवले, असा दावा संतोषसिंग राजपूत यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

तर निशा वेर्णेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, शिवपुतळा हटविण्यासंदर्भात पंचायतीने काढलेल्या आदेशाचा जाब विचारण्यास शिवप्रेमी मोठ्या संख्येने पंचायत कार्यालयाजवळ गेले होते. परंतु, सरंपचांनी आपल्या गुंडांना बोलावून शिवप्रेमींना शिवीगाळ करून भडकावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मंगळवारी पंचायत कार्यालयावर जवळपास ८००पेक्षा अधिक जणांनी चाल करुन पंचायत मालमत्तेची नासधूस केल्याची तक्रारी यापूर्वीच सरपंच सिक्वेरा यांनी कळंगुट पोलिसांत दिली आहे.

‘पुतळा हटाव’चा ठरावच बेकायदा !

करणी सेनेचे संतोषसिंग राजपूत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ज्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला , ती जागा मुळात पंचायतीच्या मालकीची नाही. तरीही पंचायतीकडून परस्पर सदर पुतळा हटविण्याचा बेकायदेशीर ठराव घेण्यात आला आणि नंतर आदेश जारी केला. त्यामुळेच, शिवप्रेमी सरपंचांना याविषयी जाब विचारण्यास पंचायत कार्यालयात दि. २० जून रोजी गेलेले.

मात्र, सरपंचांनी पोलिसांना बोलावून त्यांनी आदेश मागे घेण्यास टाळाटाळ केली.शिवाय ते आपल्या १० गुंडांना बोलावून पंचायत इमारतीवर दगडफेक करण्यास लावतात. यात पंचायत वाहनांची नासधूस होते व काही दगड हे शिवप्रेमींना देखील लागतात. या गुंडांनी शिवप्रेमींवर हल्ला करून जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या तक्रारीत केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT