Goa News: पाणीटंचाईसह आता विजेचा लपंडाव; मांद्रेवासियांवर दुहेरी संकट

मांद्रेत अधिकाऱ्यांना घेराव; उपकरणे झाली खराब
Electricity
ElectricityDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईसह आता विजेचा लपंडावही सुरू झाल्याने जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच पाऊस लांबल्याने वाढलेली आर्द्रता, उष्णता आणि त्यात विजेचा लपंडाव यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी विविध वीज कार्यालयांकडे धाव घेऊन कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

मांद्रेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आगरवाडा वीज उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन उपअभियंत्यांवर प्रश्‍नांचा भडिमार केला. वीज समस्या सुरळीत झाली नाही तर रस्त्यावर येण्याचा इशारा नारायण रेडकर आणि कार्यकर्त्यांनी दिला.

मॉन्सून पाऊस लांबल्याने राज्यात अनेक ठिकाणच्या धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पंचवाडी, अंजुणे धरणे कोरडी पडचाली आहेत. त्यामुळे या धरणांवर असलेले जलप्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत.

त्यामुळे विविध प्रकल्पांमधून लोकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांचा सरकारवरचा रोष वाढला आहे.

मांद्रे येथे कॉंग्रेस गटाध्यक्ष नारायण रेडकर यांच्यासह जिल्हा सरचिटणीस प्रणव परब, मिंगेल फर्नांडिस, रामचंद्र पालयेकर, अरुण वस्त, बाबूसो तळकर, प्रदीप सावंत, दिनेश नार्वेकर, जॉन डिसोझा, ग्रेसी मास्कारेन्हस, शशिकांत नाईक, गौतमी नाईक, सेजल ठाकूर, गीतांजली ठाकूर, निर्मला ठाकूर, प्रीती रेडकर यांनी वीज अभियंत्यांना धारेवर धरले.

Electricity
Porvorim Crime News : बनावट कागदपत्रे सादर करीत बँकेला लावला चुना; पती, पत्नीला अटक

सदोष कंडक्टर्सच समस्येचे मूळ!

दक्षिण गोव्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याबद्दल वीज कर्मचाऱ्यांना जाब विचारला जातो. मात्र, सदोष इन्सुलेटर्स आणि कंडक्टर्सच त्याला कारणीभूत आहेत. शिवाय दक्षिण गोव्यात कर्नाटकमधून वीजपुरवठा होतो. त्यामुळे वीज उपकरणांची देखभाल करताना वीज खात्याला बरेच त्रास सोसावे लागतात, असा दावा मुख्य वीज अभियंते स्टिफन फर्नांडिस यांनी केला.

आम्ही जगायचे कसे?

मांद्रे मतदारसंघात सर्रास विजेचा लपंडाव सुरू असल्याने चार-चार तास वीज गायब होते. विजेचा प्रवाह कमी-जास्त झाल्यामुळे घरातील यंत्रांमध्ये बिघाड होतो. त्यामुळे आम्ही जीवन जगायचे तरी कसे, असा सवाल काही महिलांनी उपस्थित केला.

Electricity
Goa Petrol-Diesel Price: सलग पाचव्या दिवशी इंधन दर जैसे थे! जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डीझेलचे आजचे दर

15 दिवसांत वीज पूर्ववत

राज्यात जवळ जवळ ४० टक्के वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. सासष्टीत किनारी भागांमध्ये विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.

टॅंकरने पाणीपुरवठा; पण अपुरा : अंजुणे धरणावरील पडोसे जलप्रकल्प बंद आहे. आता या प्रकल्पासाठी इतर ठिकाणाहून पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे डिचोली, वाळपई, साखळी परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. बार्देश, पेडणे तालुक्यातही पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्या आहेत.

Electricity
GCA Ground : पर्वरी मैदानाच्या खेळपट्ट्यांना ‘स्पोर्टिंग’ साज; जीसीए सचिव रोहन देसाई यांची माहिती

भूमिगत वाहिनी हवी

खंडित विजेच्या समस्येवर भूमिगत वाहिन्या हाच उत्तम उपाय आहे. त्यामुळे इन्सुलेटर्स व कंटक्टर्सचा त्रास जाणवणार नाही. शिवाय या उपकरणांसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागते. -सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

राज्यातील वीजपुरवठा यंत्रणेतील जुने इन्सुलेटर्स, कंडक्टर्स अजूनही बदललेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी कमी दाबाचा वीजपुरवठा, वीज खंडित होण्याचे प्रक्रार घडत असतात. पुढील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील भूमिगत वाहिन्यांचे काम पूर्ण होईल. त्यानंतर या समस्या उदभवणार नाहीत. - मयूर हेदे, अधिक्षक अभियंता, वीज खाते.

म्हणून वीज खंडित...

वीज खंडित समस्या जुन्या वाहिन्या तसेच उपकरणांमुळे उदभवतात. मात्र, पुढील दोन ते तीन वर्षांत भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण होईल. राज्यात ७० टक्के परिसरात वनस्पती, झाडेझुडपे आहेत. पावसात वादळी वाऱ्यामुळे वाहिन्यांवर फांद्या पडणे, शॉर्टसर्किट होणे असे प्रकार घडतात. त्यामुळे वीज खंडित होते, असे मयूर हेदे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com